शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मंगल अष्टकाआधी नवरदेवाने केली शिवगर्जना, सांगली परिसरात या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:23 IST

मंगल अष्टका सुरू होण्याआधीच अशी काही शिवगर्जना केली की सारे वातावरण शिवमय झालं

अशुतोष कस्तुरे

पलूस : सध्या विवाह सोहळे हटके पद्धतीने करण्याचा जणू ट्रेडच आला आहे. कोणी विमानात, पाण्याखाली यासह अनेक युक्त्या लढवत विवाह बंधनात अडकल्याचे आपण आधीही पाहिले आहे. असाच काहीसा अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा पलूस येथे पार पडला.या विवाह सोहळ्यात नवरदेव शिवाजी महाराजांच्या पेहराव्यात बोहल्यावर चढला. अन् त्याने मंगल अष्टका सुरू होण्याआधीच अशी काही शिवगर्जना केली की सारे वातावरण शिवमय झालं.धनगाव (ता.पलूस) चे उच्च शिक्षित असलेले ओंकार निवास पाटील आणि प्रियांका मोरे यांच्या काल, शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवरदेव ओंकारने ज्या आवाजात शिवगर्जना म्हटली ती ऐकून सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहिले आणि आपसूकच लग्न सोहळ्यात महाराजांचा जयघोष झाला.यावेळी ओंकारने छत्रपती संभाजी महाराज, आई जिजाऊ महाराज यांचाही जयघोष केला. नवरदेवाने केलेल्या या शिवगर्जनेचा व्हिडिओ सांगली परिसरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. 

ओंकार पाटील यांना गड किल्ल्यांना भेटी देण्याची आवड आहे. प्रत्येक रविवारी ते कोणत्या ना कोणत्या किल्ल्याला भेट देत असतात. त्यांच्या या शिवगर्जनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली