शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जुने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय प्रथमच शांत शांत...इमारत अनेक वर्षांची साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:38 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या धामधुमीपासून दूर; मोजकीच कार्यालये सुरू

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या घाईगडबडीपासून दूर राहणार आहे. नेतेमंडळी, कार्यकर्त्यांच्या गर्दीने फु लून जाणाऱ्या या कार्यालयासमोरील मैदान आता ओस पडले आहे.

मिरज रस्त्यावर सांगली शहराच्या वैभवात भर घालणारी भव्य व देखणी इमारत म्हणून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीकडे पाहिले जाते. सध्या याच इमारतीमधून लोकसभा निवडणुकीचे कामकाज चालत आहे. ही इमारत नवीन व आकर्षक असली तरी, आजवरच्या अनेक निवडणुकांची खरी साक्षीदार जुनी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे.

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत म्हणजे अनेक घटनांची साक्षीदार असलेली वास्तू. जिल्ह्यातील अनेक लक्षवेधी आंदोलने, मोर्चे, उपोषणे या इमारतीने अनुभवली आहेत. शहरातील राजवाडा चौकापासून जवळच ही जुनी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे. आजही या इमारतीवर त्याच्या स्थापनेचा म्हणजेच १९०९ चा उल्लेख असून, त्यावर ‘रेव्हेन्यू आॅफिसेस’ असे लिहिलेले आहे. पण आता या इमारतीमध्ये केवळ आठवणीच शिल्लक आहेत. ही इमारत कित्येक वर्षांच्या आठवणींची साक्षीदार आहे.

ब्रिटिशांच्या राजवटीपासून महसुली कारभार या इमारतीत चालत असे. स्वातंत्र्यानंतरही हीच इमारत जिल्ह्याच्या प्रशासनाची मुख्य महसुली इमारत बनली. सुरुवातीला दक्षिण सातारा व त्यानंतर जिल्ह्याच्या स्थापनेपासून या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय होते. शहरातील भुईकोट किल्ल्याचा भाग असणारी ही दगडी इमारत आजही सुस्थितीत आहे.

सध्या या इमारतीमध्ये सेतू कार्यालयासह इतर काही विभागांची कार्यालये सुरू असली तरी, इमारतीची रया गेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी जुने जिल्हाधिकारी कार्यालय सुने पडणार आहे.सर्व लोकसभा निवडणुकांच्या कामकाजाची नोंदआजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांचे कामकाज याच इमारतीतून झाले आहे. केवळ लोकसभाच नव्हे, तर सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रियाही याच इमारतीतून झाली आहे. जुन्या ठिकाणी असलेले अल्पबचत सभागृह तर अनेक जुन्या आठवणींचे साक्षीदार आहे. अनेक नेतेमंडळींची भाषणे, जिल्ह्याच्या समस्यांवरील तोडगा येथूनच होत असे. इतकेच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनात आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या अनेक अधिकाऱ्यांनीही याच इमारतीतून जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहिला होता.

सांगलीच्या राजवाड्यातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही असे ओस पडले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली