शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा - ग्राहक पंचायत

By संतोष भिसे | Updated: March 18, 2023 17:40 IST

संपाविषयी जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष

सांगली : संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा असे आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याची मागणी केली आहे.पंचायतीने निवेदनात म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सरकारचेही अतोनात नुकसान होत आहे. संपकऱ्यांसोबत बोलणी सुरु असली, तरी त्यातून काहीही यश मिळत नसल्याचे दिसत आहे. संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने संपकऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था उभी करावी.

सुशिक्षित बेरोजगार युवकाना संधी द्यावी. त्यांच्या नियुक्तीने अनुभवाअभावी जनतेची कामे वेळेत होणार नाहीत हे खरे आहे, परंतू, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही वेळेत कामे होत नाहीत, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नवख्या तरुणांना नागरिक समजून घेतील, पाठींबा देतील. संपकरी कर्मचाऱ्यांनीही जनतेला वेठीस धरू नये. त्यांच्या न्याय्य मागण्यांना नेहमीच पाठींबा आहे, परंतु संप समर्थनीय नाही. निवेदनावर पंचायतीचे जिल्हा पालक भास्कर मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, उपाध्यक्ष महेश शानभाग, दत्ताजीराव मोहिते, जिल्हा संघटक जनार्दन झेंडे, विनायक पाटील, दीपक सगरे, भालचंद्र कुलकर्णी, शहाजीराव कदम, रावसो दळवी यांच्या सह्या आहेत.जनतेत तीव्र असंतोषग्राहक पंचायतीने निवेदनात म्हंटले आहे की, संपाविषयी जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण कोल्हापूर येथील युवकांच्या मोर्चाचे आहे. संपकऱ्यांनीही हे ध्यानी घ्यायला हवे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन