शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेचे अधिकारी म्हणतात, सूतगिरणीची विक्री बेकायदेशीरच; कायदेशीर अभिप्राय मागवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 13:14 IST

याप्रकरणी बँक व संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने विक्री व्यवहार रद्द करून सूतगिरणी पुन्हा ताब्यात घेता येते का, याची चाचपणी सुरू

सांगली : आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी खासगी कंपनीला कवडीमोल दराने विकण्यात आल्याने वस्त्रोद्योग मंडळाने जिल्हा बँकेला खडसावले आहे. याबाबत बँकेच्या संचालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ही विक्री बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत मान्य केले आहे. याप्रकरणी बँक व संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने विक्री व्यवहार रद्द करून सूतगिरणी पुन्हा ताब्यात घेता येते का, याची चाचपणी सुरू झाली आहे. यासाठी तज्ज्ञ वकिलांकडून कायदेशीर अभिप्राय मागवण्यात येणार आहे.देशमुख सूतगिरणीकडील १४ कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने सूतगिरणीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा लिलाव केला. लिलावावेळी वाजवी किंमत (अपसेट प्राइस) ४० कोटी रुपये ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात सूतगिरणी अवघ्या १४ कोटी रुपयांना बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज या खासगी कंपनीला विकण्यात आली. विक्री करताना बँकेने सूतगिरणीवरील अन्य २५ कोटींची देणी कंपनीने फेडावीत यासह अन्य अटी, शर्ती घातल्या होत्या.

जिल्हा बँकेने स्वत:चे कर्ज फेडून घेत अन्य देण्यांची जबाबदारी संबंधित कंपनीवर टाकून हात रिकामे केले; पण यामुळे सूतगिरणीवरील अन्य देणी कोण फेडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यवहाराची माहिती मिळताच वस्त्रोद्योग मंडळाने बँकेच्या आजी, माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून कानउघाडणी केली. याप्रकरणी बँकेवर वसुलीची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.सूतगिरणीची विक्री मागील संचालक मंडळाच्या काळात झाली आहे. त्यामुळे काही विद्यमान संचालकांना याची माहितीच नव्हती. याप्रकरणी संबंधित संचालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ही विक्री बेकायदेशीरच असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत मान्य केले. वस्त्रोद्योग मंडळांच्या दणक्यानंतर व संचालकांच्या नाराजीनंतर संबंधित कंपनीने तातडीने शासकीय व अन्य देणी न दिल्यास हा विक्री व्यवहार रद्द करण्याचा विचार जिल्हा बँक करत आहे. सूतगिरणीच्या मालमत्तेचा पुन्हा ताबा घेऊन फेरलिलाव काढता येतो का, याबाबत कायदेशीर अभिप्राय घेत असल्याचे संचालकांनी सांगितले.४० नव्हे १४ कोटींनाच विक्रीसूतगिरणीचा विक्री व्यवहार १४ कोटींचाच असून, या रकमेचे मुद्रांक शुल्क भरले आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ही सूतगिरणी १४ कोटींनाच विकली गेल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक