सांगली : मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपला संमिश्र संस्कृती असलेला देश आहे. अशा देशात निवडणुका मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे. लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी, लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. मतदान करून लोकशाहीचा आदर ठेवा. आपल्याबरोबर आपले कुटुंबिय, शेजारी, मित्र यांची विचारधारा नकारात्मक असेल, तर ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे मोल अनमोल असून आपल्या एका मतामुळे आपण राष्ट्र उभारणीचे काम करीत असतो. लोकशाहीचा निर्णय प्रत्येक जबाबदार नागरिकावर आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीचे सरकार निवडून आणण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. हा हक्क मिळवण्यासाठी, विशेषतः महिलांना हा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. संघर्षातून मिळालेला हा अधिकार म्हणजे लोकशाहीला बळ देण्याची संधी आहे. त्यामुळे आगामी लोकशाही, विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावा, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात मीनाज मुल्ला म्हणाले, अनेक उपक्रमांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. दिव्यांग मतदार नोंदणीत सांगली जिल्हा राज्यात प्रथम स्थानी तर मतदार नोंदणी कार्यक्रमात राज्यात द्वितीय स्थानी आहे. भारत निवडणूक आयोगाचे नो व्होटर टु बी लेफ्ट (कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहु नये) हे घोषवाक्य आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. प्रत्येकाने मतदान करावे.यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठीची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच, चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्त्व, प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश चित्रफीतीद्वारे दाखवण्यात आला. तसेच, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमानंतर दिव्यांगांनी मतदार जागृतीबाबत सादर केलेले पथनाट्य उपस्थितांचे आकर्षण ठरले. यावेळी विविध अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सांगलीत मानवी साखळी व रॅली उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:44 IST
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सांगलीत मानवी साखळी व रॅली उत्साहात
ठळक मुद्देलोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा : काळमराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मानवी साखळी व रॅली उत्साहात संपन्न