शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:52 IST

शंखध्वनी आंदोलन : शासनाविरोधात निदर्शने

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठीच्या शेतकऱ्यांच्या हरकती प्रांताधिकारी यांनी फेटाळल्या आहेत. यासंबंधीच्या नोटिसा शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत. या नोटिसांची शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली. शासनाच्या नावाने शंखध्वनी आंदोलनही शेतकऱ्यांनी करून राज्य सरकारचा निषेध केला.शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीचे पदाधिकारी उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

वाचा- शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनअखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा राज्य सरकारचा आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाचे काम रद्दच झाले पाहिजे. प्रसंगी शेतकरी कुटुंबीयासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास बसणार आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मातीत घालत आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सरकारचे षडयंत्र हाणून पाडू. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी प्रभाकर तोडकर, अजित हळीगले, विष्णू पाटील, उमेश एडके, अधिक पाटील, रघुनाथ पाटील, रवींद्र साळुंखे, नितीन झांबरे, सुनील पवार, विक्रम हारूगडे, राजाराम माळी, रमेश एडके, अधिक शिंदे, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजू एडके, प्रमोद एडके, पांडुरंग मिसळ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांडवलदारांच्या सोयीसाठी शक्तिपीठ महामार्ग : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग करण्याची राज्यातील एकाही शेतकऱ्यांची मागणी नाही. सर्वसामान्य नागरिकांमधूनही मागणी नाही. तरीही शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. भांडवलदारांच्या हितासाठी हजार शेतकऱ्यांना भूमीहिन करत आहे. या शेतकऱ्यांचा उद्रेकच शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडतील, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.