तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्याप्रकरणी विजय जालिंदर पाटील (रा. वडगाव, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेवून समज देऊन सोडले आहे. दरम्यान, आमदारांबद्दल गलिच्छ भाषेत पोस्ट व्हायरल केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.विजय पाटील याने फेसबुकवर आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली. पोस्ट पाहून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा हातनूर येथील सचिन काशिनाथ पाटील यांनी विजय पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, वडगाव येथील एकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:26 IST