शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जा उपयुक्त : संजय उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:49 IST

मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार

ठळक मुद्देआर.आय.टी. व भाभा आण्विक केंद्राच्यावतीने इस्लामपूर येथे प्रदर्शन व चर्चासत्र

इस्लामपूर : मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचायला हवा, असे प्रतिपादन लेखक, तत्त्वज्ञ डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी व मुंबईच्या भाभा परमाणू संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शांती, शक्ती आणि समृध्दीसाठी अणुऊर्जा’ या विषयावरील प्रदर्शन आणि चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. उपाध्ये यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. माजी कुलगुरु डॉ. एस. एच. पवार, भाभा केंद्राचे आर. के. सिंग, नियामक मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील, सचिव प्रा. आर. डी. सावंत, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आर. के. सिंग म्हणाले, अणुऊर्जेच्या विकासविषयक वापरावर आपण भर द्यायला हवा. अणुऊर्जेपासून होणाऱ्या वीज निर्मितीला अज्ञानातून होत असलेला विरोध अनाकलनीय आहे. वास्तविक अणुउर्जेबाबत असलेले गैरसमज दूर करून प्रत्येकाने या नवीन स्रोताचा देशाच्या विकासाकरिता स्वीकार केला पाहिजे.

यावेळी आर.आय.टी.च्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांचा सत्कार करण्यात आला.संचालिका डॉ. सौ. कुलकर्णी म्हणाल्या, जगभरातील तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांसाठी संशोधनाभिमुख शिक्षण पध्दती अवलंबणारे आर.आय.टी. महाविद्यालय अग्रस्थानी आहे. अणुऊर्जा वापरासंंबंधी जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाकडून विशेष प्रयत्न होईल.

भाभा परमाणू केंद्राच्या डॉ. एस. टी. म्हेत्रे, डॉ. सुनीता सोनवणे, राजेश पतंगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समन्वय समितीचे सदस्य डॉ. ए. बी. काकडे, प्रबंधक राजन पडवळ, सूर्यकांत दोडमिसे यांनी काम पाहिले. डॉ. हेमलता गायकवाड, प्रा. भारती उगळे, प्रा. गौतमी शिंगण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रतिभा जगताप यांनी आभार मानले.सायकल रॅलीसकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून अणुऊर्जेचा प्रसार आणि प्रचारासाठी सिंग यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या रॅलीची सांगता आर.आय.टी.च्या प्रांगणात झाली. 

टॅग्स :Sangliसांगली