शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आता या अन्यायाचा कळस झाला आहे--आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:59 IST

जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देजातीच्या दाखल्याचा प्रश्न

सांगली : सांगली जिल्हा आदिवासी कोळी, महादेव, टोकळे, ढोर कोळी, मल्हार, डोंगर कोळी जमात संघर्ष समितीच्यावतीने २४ मार्च रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन समितीच्यावतीने अप्पर जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

समितीच्यावतीने हे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे संजय कोळी, कुमार आप्पा कोळी, हणमंत पाटील, डी. के. पाटील, प्रविण पाटील, पांडूरंग कोळी अमोल नाद्रेकर, धर्मेद्र कोळी, जयसिंगराव कोळी, विनायक येडके उपस्थित होते. संजक कोळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  आम्हाला घटनेमध्ये  संविधानिक अधिकार दिलेला असताना  महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी , मल्हार कोळी, डोंगर कोळी, आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांवर स्वातंत्र्यानंतर सतत अन्याय होत राहिला.

आता या अन्यायाचा कळस झाला आहे. नोकरदारांना अकरा महिन्याची नोटीस देऊन पूर्णपणे पारतंत्र्यात टाकले आहे. समाजातील तरुणांसमोर नोक-यांचा तर नोकरदारांना बेरोजगार होण्याचा प्रश्न सतावत आहे. कोणत्याही प्रकारे शासन आणि प्रशासन कोळी समाजाला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. शासनाने लवकरात लवकर आमची जात दाखवावी, आम्हाला महादेव कोळीचे प्रमाणपत्र विनासायास लवकरात लवकर मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू