शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आता विमान उतरण्याची सोय, ४० हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च

By संतोष भिसे | Updated: September 5, 2023 19:04 IST

भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू

संतोष भिसेसांगली : बहुचर्चित पुणे-बंगळुरू हरित महामार्गाचा (ग्रीनफिल्ड कॉरिडॉर) प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर होणार आहे. भारतमाला प्रकल्पातून हे काम केले जात असून त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून महामार्गाचा प्रवास होणार आहे. सांगली जिल्ह्यात या तालुक्यांत त्यासाठी भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू आहे.राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे हरित महामार्गाचे काम केले जाणार आहे. सध्याच्या पुणे-बंगळुरू महामार्गापेक्षा नवा महामार्ग लांबीला ९३ किलोमीटरने कमी आहे, त्यामुळे सुमारे दोन तास लवकर पुण्याहून बंगळुरू गाठता येणार आहे. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून त्याचा प्रवास होईल. यानिमित्ताने जिल्ह्याला चौथा राष्ट्रीय महामार्ग मिळणार आहे. खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावांतून जाईल. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाणमधून महामार्ग जाईल.कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळीमध्ये भूसंपादन होईल. मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांचाही महामार्गात समावेश आहे.दृष्टिक्षेपात हरित महामार्ग

  • एकूण लांबी : ७४५ किलोमीटर
  • एकूण अंदाजित खर्च : ४० हजार कोटी
  • मार्गिकांची संख्या : ८
  • रुंदी : १०० मीटर (पुणे-मुंबई महामार्गापेक्षा रुंद)
  • काँक्रीटच्या समृद्धी महामार्गासारखे अपघात टाळण्यासाठी डांबरीकरण
  • ताशी १२० किलोमीटर गतीने प्रवास शक्य
  • पुण्यात वरवे बुद्रुकपासून प्रारंभ
  • पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून जाणार

चक्क विमान उतरविण्याची सोयनव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरविण्यासाठी पाच किलोमीटर लांबीची हवाई धावपट्टी असेल. अशी धावपट्टी असणारा हा महाराष्ट्रातील समृद्धीनंतर कदाचित एकमेव महामार्ग असेल. भविष्यातील नव्या महामार्गांसाठी हा मॉडेल ठरणार आहे.मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातून...सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव तालुक्यांतून महामार्गाचा प्रवास असेल. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतून जाईल. कर्नाटकात बेळगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर यामार्गे बंगळुरूला जोडला जाईल.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग