शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

घनकचरा आराखड्यासाठी आता सल्लागार

By admin | Updated: June 14, 2015 00:03 IST

निविदा मागविणार : पुढील आठवड्यात महापालिकेकडून कार्यवाही

सांगली : घनकचऱ्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याची शिफारस तांत्रिक समितीने केली आहे. त्यानुसार शासन यादीवरील चौदा कंपन्यांशी महापालिका संपर्क साधणार आहे. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी जाहीर निविदा मागवून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. पंधरा वर्षांत महापालिकेने घनकचरा प्रकल्प राबविला नसल्याने जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. हरित न्यायालयाने घनकचरा प्रकल्पासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स, मुंबईतील आयआयटी व सांगलीतील वालचंद महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. एका ठिकाणी कचरा साठविणे व वर्गीकरण करणे, दुसऱ्या ठिकाणी सेंद्रीय खत निर्मिती करावयाची आहे. प्रकल्प आराखड्यासह कंपन्यांची नियुक्ती व कायदेशीर, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. आयआयटी, वालचंद व गोखले इन्स्टिट्यूट या समितीची पहिली बैठक गेल्या महिन्यात झाली. आता तांत्रिक समितीने महापालिकेला प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. शासनाच्या यादीवरील चौदा कंपन्या घनकचऱ्याचा आराखडा तयार करतात. या कंपन्यांपैकी एकाची नियुक्ती केली जाणार आहे. कमीत कमी दरात प्रकल्प आराखडा तयार करणाऱ्या कंपनीला काम देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)