शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठी आता जोगवा मागताय, कोरोना काळात कुठे होता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:39 IST

Politics sangli- आरग (ता. मिरज ) येथील एका सजग मतदाराने कोरोना काळात झालेल्या त्रासाचे पुरेपूर उट्टे या निवडणुकीत काढले आहेत. कोरोना काळात पाठ फिरविलेल्या नेतेमंडळींना मत मागण्यासाठी आमच्या दारात येऊ नये असे खडे बोल सुनावले आहेत, किंबहुना तसे फलकच घराच्या गेटवर लावले आहेत.

ठळक मुद्देमतांसाठी आता जोगवा मागताय, कोरोना काळात कुठे होता ? आरगमधील मतदाराने सुनावले खडे बोल, घरावर लावले फलक

संतोष भिसे सांगली - राजकारण्यांच्या आयुष्यातील सर्वात संघर्षाचा काळ कोणता म्हणाल तर तो निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी ! या काळात मतदार खऱ्या अर्थाने राजा असतो. भल्याभल्यांना त्याच्यापुढे माना तुकवाव्या लागतात. सध्या याचे प्रत्यंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवाराला अनुभवायला मिळत आहे.

आरग (ता. मिरज ) येथील एका सजग मतदाराने कोरोना काळात झालेल्या त्रासाचे पुरेपूर उट्टे या निवडणुकीत काढले आहेत. कोरोना काळात पाठ फिरविलेल्या नेतेमंडळींना मत मागण्यासाठी आमच्या दारात येऊ नये असे खडे बोल सुनावले आहेत, किंबहुना तसे फलकच घराच्या गेटवर लावले आहेत.प्रचाराच्या रणधुमाळीत या फलकाने नेतेमंडळींना जणू त्यांची जागा दाखवून देण्याचेच काम केले आहे. मतदानाचा दिवस संपताच मतदारांना तुच्छ लेखणाऱ्या प्रत्येक नेत्याने लक्षात ठेवावा असाच हा संदेश आहे. गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचे रान उठले आहे. गल्लीबोळातून उमेदवार मते मागत फिरत आहेत.गावात मध्यवस्तीत राहणाऱ्या शेट्टी कुटुंबाला कोरोनाच्या काळात बराच त्रास सोसावा लागला. स्वतला गावाचे पोशिंदे समजणाऱ्या तथाकथित नेत्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरविली. संकटकाळात नेत्यांच्या मदतीची, सहानुभुतीची गरज असल्याने शेट्टी कुटुंबाने विनंती केली, पण नेत्यांकडून त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली.आता ग्रामपंचायतीचे रणांगण सुरु होताच नेतेमंडळींना शेट्टी कुटुंबातील मतदार दिसू लागले. उपेक्षेमुळे नेत्यांबद्दल घृणास्पद भावना निर्माण झालेल्या शेट्टी यांनी स्वयंघोषित नेत्यांना आता चार हात दूरच ठेवले आहे.नेते मंडळींनो, चार हात लांबच रहाशेट्टी यांनी घराच्या दोन्ही गेटवर चक्क डिजीटल फलकच लावले आहेत. कोरोनाकाळात मदत व सहकार्य केलेल्यांनीच मतदानासाठी भेटावे अशी सूचना झळकविली आहे. कोरोना काळात आपण केलेले प्रताप आठवून नेतेमंडळी या घराकडे जाण्याचे धाडस करेनासे झाले आहेत. सजग शेट्टी कुटुंबाने संधीसाधू राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली