शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पूरपट्ट्यातील तीन हजार घर मालकांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST

तातडीने उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना

सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमध्ये सुमारे तीन हजार घरे धोकादायक आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील १०४ गावांना पुराचा धोका आहे. या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते. त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. अधिक धोकादायक असणाऱ्या घर मालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो. गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घरांचे सर्वेक्षण करून या घराची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही नोटिसांद्वारे दिला आहे.पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते; मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणे शक्य नाही. तेव्हा, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी घरे दुरुस्त करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी, या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे.

धोकादायक घरांची संख्या जैसे थेगतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही; मात्र गतवर्षी १०९ गावांतील तीन हजार ८८ धोकादायक घरे आढळून आली होती. यंदा १०४ गावांत दोन हजार ९३३ धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत. यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्या आहेत; मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आले आहे. एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का, हा प्रश्न आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.

तालुकानिहाय धोकादायक घरेतालुका / गावे / धोकादायक घरेवाळवा ३७ / १०३२शिराळा २० / १५३पलूस २७ / १३५७मिरज २० / ३९१