शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

कृष्णा नदी प्रदुषण प्रकरणी सांगली महापालिकेला नोटीस

By शीतल पाटील | Updated: September 17, 2022 20:30 IST

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क 

सांगली: शेरीनाल्याचे पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडल्याप्रकरणी महापालिकेने सात दिवसात खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी महापालिकेला दिला आहे. त्यासंदर्भात आयुक्तांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.ओंकार वांगीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला यापुर्वीच नोटीशी दिल्या आहेत. याशिवाय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुनील फराटे यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर याचिका दाखल केली आहे. आता नोटीस आयुक्तांना बजावण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेरीनाल्याचे पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आलेले अपयश, धुळगाव योजना राबवण्यात आलेले अपयश, पर्यावरणाच्या सर्व निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत मंडळाच्या अधिकार्‍यांचे यापुर्वीचे अहवाल, आवश्यक चौकशी केल्यानंतर महापालिका याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.त्यामुळे जल प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९७४ च्या कलम ३३ अ आणि हवा प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 अन्वये मंडळाने अधोस्वाक्षरी केलेल्या अधिकाराचा वापर करून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसात महापालिकेने या आक्षेपावर उत्तर न आल्यास पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा नोटीसीव्दारे दिला आहे.

दंडाची रक्कम अधिकार्‍यांच्या पगारातून घ्या...

नदी प्रदूषित केल्याबद्दल महापालिकेला दररोज १ लाख ६० हजार रूपये प्रमाणे  दंड केला जातो. हा दंड स्वतंत्र खात्यावर जमा केला आहे. ऑक्टोबर २०१९ अखेर २ कोटी ६२ लाख ४० हजार रूपये जमा झाले आहेत. शिवाय १६ जानेवारी २०२० पासून प्रतिदिन १ लाख ६० हजार रूपये दंड आकारला जात आहे. इतका दंड होत असताना  महापालिका कोणतीच उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे.  दंड भरून नदी प्रदूषित करण्याचा परवाना घेतल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे यापुढे दंडाची रक्कम अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल करावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अ‍ॅड.ओंकार वांगीकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sangliसांगली