शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ताकारी योजनेची पाणीपट्टी चुकवणाऱ्या २५० शेतकऱ्यांना नोटीस

By हणमंत पाटील | Updated: June 25, 2024 18:29 IST

सात-बारावर बोजा चढणार; ताकारी योजनेचा वसुली विभाग ॲक्शन मोडवर

अतुल जाधवदेवराष्ट्रे : ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना ऊस घालवून ताकारी योजनेची पाणीपट्टी भरलेली नाही, अशा २५० शेतकऱ्यांना ताकारी योजनेच्या वसुली विभागाने वसुलीच्या नोटीस काढल्या आहेत. ताकारी योजनेचा वसुली विभाग पाणीपट्टी मुद्दामहून चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात ॲक्शन मोडवर आहे. सातबारावर बोजा चढविण्याचीही तयारी केली आहे.ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या परिसरातील सोनहिरा, कृष्णा, क्रांती, उदगिरी, वसंतदादा, हुतात्मा, राजारामबापू या कारखान्यांना ऊस ज्या शेतकऱ्यांनी पाठवला आहे. त्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी ताकारी योजनाला परस्पर कारखान्याच्या माध्यमातून जमा झाली आहे; मात्र ताकारी योजनेची पाणीपट्टी भरायची नाही, ती चुकवायची हा दृष्टिकोन ठेवून ज्या शेतकऱ्यांनी गेटकेनच्या माध्यमातून इतर कारखान्यांना म्हणजेच दालमिया शुगर, उगार शुगर, सह्याद्री कारखाना, अथणी शुगर रयत युनिट, विराज शुगर, केन ॲग्रो रायगाव, ग्रीन पॉवर गोपुज कारखान्याला ऊस घालवला आहे; 

मात्र या कारखान्यांनी या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुली करून ती ताकारी योजनेकडे जमा केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाखो रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली नाही, ती पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस घालवला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच २५० शेतकऱ्यांना पाणीपट्टी वसुलीची नोटीस बजावली आहे. ती पाणीपट्टीची वसुली शेतकऱ्यांनी तत्काळ ताकारी योजनेच्या कार्यालयात आणून न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर पाणीपट्टीचा बोजा चढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.यादी नसल्याने वसुलीला अडचणी..पाणीपट्टी वसुलीसाठी गेटकेनचे कारखाने व कार्यक्षेत्रातील कारखाने वसुलीसाठी सहकार्य करीत आहेत; मात्र ग्रीन पॉवर गोपुज, केन ॲग्रो रायगाव यांनी अजूनही शेतकऱ्यांची वसुली यादी दिली नसल्याने वसुलीला अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी