शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीच्या ११५ व्यापाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 15:23 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले.

ठळक मुद्देसांगली बाजार समितीच्या ११५ व्यापाऱ्यांना नोटिसाबाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर, सायंकाळी उशिराने ११५ व्यापाऱ्यांना कारवाईबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या.सांगली कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात ८२ परवानाधारक तोलाईदार अनेक वर्षांपासून वजन-मापे भाणि त्यासंबंधित कामे करत आहेत. तत्कालीन पणन संचालकांनी लोवीनिक्स काट्यावर वजन-मापे करताना तोलाई कपात करू नये, असा आदेश १६ डिसेंबर २०१४ मध्ये दिला.

त्याला तत्कालीन पणन संचालक चंद्रकांत पाटील यांनी २२ डिसेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली. त्याविरोधात चेंबर आॅफ कॉमर्स सांगली आणि काही व्यापारी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, तेव्हा १६ डिसेंबरचा आदेश लागू केला.तोलाईदार सभेने त्यावर दाद मागितली असता, शासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले. एक डिसेंबर २०१८ रोजी १६ डिसेंबरचा आदेश राज्यासाठी लागू केला. त्यानंतर तीन आॅक्टोबरपासून तोलाईदार काम करू लागले आहेत. परंतु आॅक्टोबरपासून त्यांची तोलाई जमा केलेली नाही. त्याबाबत २६ डिसेंबरपासून तोलाईदार सभेने बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या प्रश्नांवर बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र पाच वाजेपर्यंत सभापती बाजार समितीत आले नाहीत. यामुळे संचालक बाळासाहेब बंडगर संतप्त झाले. सभापतींना तोलाईदारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तातडीने व्यापाऱ्यांना नोटिसा न दिल्यास शुक्रवारी बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.त्यानंतर अर्ध्या तासांनी सभापती पाटील बाजार समितीत आले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याच्या सूचना दिल्याने, अधिकाऱ्यांनी धावाधाव करीत व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन नोटिसा पोहोच केल्या. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डSangliसांगली