शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इव्हीएममध्ये नाही, त्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:47 IST

इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली. सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देइव्हीएममध्ये नाही, त्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीसजयंत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा टोला, महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत

इस्लामपूर/सांगली : इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली.सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या यात्रेत महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. या यात्रेचे स्वागत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी यात्रेत सामील झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले.महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पेठ नाका येथे या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. यावेळी महाडिक गटाचे राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना तलवार भेट देऊन यात्रेला शुभेच्छा दिल्या.बोरगाव येथे नायकवडी कुटुंबाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यात्रेचे स्वागत केले. गौरव नायकवडी यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या तसेच जल्लोषी स्वागत केले. यावेळी गौरव नायकवडी, वैभव नायकवडी, सुषमा नायकवडी यानी महाजनादेश यात्रेच्या रथावर जावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधून पाच मिनिटे मनोगत व्यक्त केले.कऱ्हाड मध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये दाखलदरम्यान, कऱ्हाड येथील कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी छत्रपती उदयनराजे यांच्यासह शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्याला सोमवारी मूर्तस्वरूप आले. कऱ्हाडमध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त मुक्कामी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेदरम्यान हा प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासोबत फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, पी. वाय पाटील, बाजीराव शेडगे असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाSangliसांगली