शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीस वारंवार गैरहजेरी, राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:57 IST

राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कु. पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे.

शिराळा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनाची लागण झाल्यामुळे बुधवारी शिराळा प्रथम वर्ग न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. वारंट हुकूम होऊनदेखील ते न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले तर मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता या खटल्याची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट रद्द व्हावे यासाठी रीट दाखल केला आहे. यावर आज-गुरुवार, दि. ९ जून रोजी सुनावणी हाेणार आहे.

शिराळा न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष ठाकरे व जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र हे दोघेही बुधवारच्या सुनावणीस गैरहजर होते. सुनावणीवेळी सरकारी वकील संदीप पाटील यांनी २००८ पासून या खटल्यातील आरोपी तारखेला हजर राहात नाहीत. त्यामुळे पारकर यांना जामीन मंजूर करू नये, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, असा युक्तिवाद केला.मात्र न्यायालयाने पारकर यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर व ७०० खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर केला. राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कु. पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रिट दाखल केले आहे.

सुनावणीस वारंवार गैरहजेरी

२००८ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी मनसेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी राज ठाकरे यांना अजामीनपात्र वारंट बजावले हाेते. पोलिसांकडून वॉरंट बजावणी होऊनदेखील न्यायालयात हजर न राहिल्याने १८ जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनाच या दोघांना का अटक केली नाही? अशी विचारणा करीत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली हाेती.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय