शिराळा
: संजय गांधी निराधार योजनेमधून ३८ प्रस्ताव व श्रावण बाळ योजनेतून १७ असे सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबालाही पेन्शन योजना मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे, समितीचे अध्यक्ष संपतराव शिंदे यांनी दिली.
येथील तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक अध्यक्ष संपतराव शिंदे व नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. संजय गांधी निराधारचे ३८ व श्रावण बाळ योजनेचे १७ असे सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचपद्धतीने ज्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबालाही पेन्शन मिळावी, याकरिता आमदार मानसिंगराव नाईक यांनी विशेष प्रयत्न करून त्यांनाही पेन्शन सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सदस्य निलोफर डांगे, सुनील तांदळे, संभाजी उपलाने, ए. बी. पाटील, संध्याराणी निकम, संदीप पाटील उपस्थित होते.