शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

आयएमएच्या संपाविरोधात निमाची पिंक रिबन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 2:50 PM

doctor, medical, sangli आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप जाहीर केला आहे. त्याला आव्हान देताना आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना निमाने पिंक रिबन मोहीम जाहीर केली आहे. यादिवशी राज्यभरातील आयुर्वेदिक डॉक्टर हाताला गुलाबी फीत बांधून रुग्णसेवा करतील. शिवाय रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.

ठळक मुद्देआयएमएच्या संपाविरोधात निमाची ११ डिसेंबरला पिंक रिबन मोहीमआरोग्यसेवा अखंड राखण्यासाठी शिबिरेही घेणार

संतोष भिसेसांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप जाहीर केला आहे. त्याला आव्हान देताना आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना निमाने पिंक रिबन मोहीम जाहीर केली आहे. यादिवशी राज्यभरातील आयुर्वेदिक डॉक्टर हाताला गुलाबी फीत बांधून रुग्णसेवा करतील. शिवाय रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.यानिमित्ताने आयएमए आणि निमा संघटना आमने-सामने आल्या आहेत. सरकारने पंधरवड्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगीचा निर्णय जाहीर केला. अनेक जोखमीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. याला डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने तीव्र विरोध केला आहे.निमाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्वांसाठी आरोग्य या सरकारच्या धोरणाला आयएमएने अपेक्षेप्रमाणे विरोध केला आहे. त्यांच्या प्रस्तावित संपाला निमाचा तीव्र विरोध राहील. सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठाम राहण्याचे निमाने ठरविले आहे. त्यानुसार ११ डिसेंबरला निमाशी सर्व संलग्न रुग्णालये सुरू ठेवली जातील.आयएमएच्या संपाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. निमाच्या देशभरातील १ हजार २०० शाखा यादिवशी पूर्ण ताकदीने आरोग्य सेवा देतील. प्रसंगी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णसेवेत खंड पडू दिला जाणार नाही. सरकारच्या निर्णयाचे स्वागत म्हणून गुलाबी फिती बांधून काम केले जाईल.निमासह सर्व संघटना पिंक रिबनमध्येनिमाच्या या उपक्रमात आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत. आयएमएच्या संपामुळे रुग्णसेवा कोलमडू नये यासाठी पूर्ण क्षमतेने रुग्णालये सुरु ठेवणार आहेत.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिल्याने इतरांना पोटशूळ उठण्याचे कारण नाही. आयएमएच्या अनेक उपक्रमांना, आंदोलनांना आम्हीही वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. सरकारने आम्हाला शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिल्याने सर्वांना आरोग्य हा हेतू साध्य होणार आहे. त्यामुळे ११ डिसेंबररोजी निमासह सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटना पिंक रिबनसह पूर्ण ताकदीने रुग्णसेवा देतील.- डॉ. अनिल बाजारे, महाराष्ट्र सचिव, निमा

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलSangliसांगलीdocterडॉक्टर