शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला झळाळी, सांगलीत क्विंटलला 'इतका' तर राजापुरीला उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:58 IST

पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी

सांगली : सांगली मार्केट यार्डात मंगळवारी नवीन हळदीच्या सौद्यास प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये ८६२ पोती राजापुरी हळदीची आवक झाली असून प्रति क्विंटल १० हजार १०० रुपये ते सात हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून, भविष्यातही दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.जिल्हा उपनिबंधक महेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, हळद खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल, गोपाळ मर्दा, मनोहर सारडा, सत्यनारायण अटल, मधुकर काबरा, अभय मगदूम, एन. बी. पाटील आदी उपस्थित होते.हळद सौद्यामध्ये पेड ता. तासगाव येथील शेतकरी विनोद शेंडगे यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल १० हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. या हळद सौद्यामध्ये कमीत कमी सात हजार ५०० ते जास्तीत जास्त १० हजार १०० व सरासरी पाच हजार रुपये दर मिळाला आहे. या सौद्यामध्ये ८६२ पोती नवीन स्थानिक हळदीची आवक झाली.

हळदीसह अन्य शेतीमालाचे दर पडले तर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीची गडबड करू नये. शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तर बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज देण्याची सोय आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. -महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती.

टॅग्स :Sangliसांगली