शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर नवीन हळदीच्या सौद्याला प्रारंभ, राजापुरी हळदीला मिळाला 'इतका' भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:04 IST

पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी

सांगली : सांगली मार्केट यार्डात शनिवारी नवीन हळदीच्या सौद्यास प्रारंभ झाला. पहिल्याच सौद्यामध्ये राजापुरी हळदीला प्रति क्विंटल २२ हजार तर हालक्या प्रतिच्या हळदीला प्रति क्विंटल १२ हजार रुपये दर मिळाला आहे. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून, भविष्यातही दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला. यावेळी सांगली बाजार समिती सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. 

हळद सौद्यामध्ये बावची ता. वाळवा येथील शेतकरी अमोल पाटील यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल २२ हजार रुपयांचा उचांकी दर मिळाला आहे. सदरची हळद मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली आहे. सदरच्या हळद सौद्यामध्ये कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त २२ हजार) व सरासरी दर १२ हजार इतका मिळाला आहे. सदर सौद्यामध्ये ३९५६ पोती नवीन स्थानिक हळदीची आवक झाली.

हळदीचा प्रकार आणि आजअखेर आवक (क्विंटल)राजापुरी : ८५०५३४ चोरा : १०९९परपेठ : १३६०६३

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर शनिवारी नवीन हळदीच्या सौद्याला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच सौद्यामध्ये उच्चांकी प्रति क्विंटल २२ हजार रुपये दर मिळाला आहे. तसेच कमीत कमी क्विंटलला १२ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. कोरोनामुळे हळदीला मागणी वाढली असून दर तेजीत कायम असणार आहे. -दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती.

टॅग्स :Sangliसांगली