शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

 नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयात आजपासून कामकाज; उदघाटन होणार यथावकाश 

By संतोष भिसे | Updated: December 3, 2023 18:45 IST

सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी नुतन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत पूर्ण होऊन चार महिने झाल्यानंतर अखेर कामकाजाला मुहूर्त सापडला आहे.

सांगली : सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी नुतन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत पूर्ण होऊन चार महिने झाल्यानंतर अखेर कामकाजाला मुहूर्त सापडला आहे. आज, सोमवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयात कामकाज सुरू होणार आहे. इमारत पूर्ण होऊनही उदघाटनाअभावी स्थलांतर थांबले होते. अखेर उदघाटन नंतर करू आता कामकाज सुरू करा, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गुरूवारपर्यंत सर्व कामकाज नवीन इमारतीमधूनच सुरू होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे काम पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन रखडल्याने इमारत धूळखात पडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला होता.

जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर विश्रामबागला १९६७ मध्ये सध्याचे पोलिस मुख्यालय उभारण्यात आले होते. आतापर्यंत इमारत जीर्ण झाल्याने व पोलिस दलाचाही विस्तार झाल्याने नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यानुसार या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. ठेकेदारानेही दिलेल्या निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून दिले होते. सांगली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारतीमुळे प्रशासकीय वैभवात भर पडली होती. मात्र, इमारत पूर्ण होऊनही त्यातून कामकाज होत नव्हते. जिल्ह्यातील इतर विकासकामांसह या इमारतीचेही उदघाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, तीनवेळा ठरलेला मुहूर्त लांबणीवर पडला होता. अखेर गृह विभागाने कामकाज सुरू करावे उदघाटनाबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार शुक्रवारपासून जून्या इमारतीमधील सर्व विभाग स्थलांतरी करण्यात येत होते. सोमवारपासून सर्व काम सुरू होईल. काही विभागाचे दप्तर येण्यास विलंब लागणार असल्याने गुरूवारपासून पूर्ण कामकाज नवीन इमारतीमधून होणार आहे.चौकट

‘लोकमत’चा पाठपुरावाइमारत पूर्ण होऊनही केवळ नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने देखण्या इमारतीचे उदघाटन रखडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. सामाजिक संघटनांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर गृह विभागानेच उदघाटन नंतर होईल कामकाज सुरू करा असे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Sangliसांगली