मिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:33 AM2020-09-30T11:33:21+5:302020-09-30T11:36:52+5:30

अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी मिठाई विक्रीबाबत नविन नियम लागू केले असून मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रेसमोर/काचेच्या शोकेसवर मिठाईची  Expiry Date (Best Before) नमुद करणे आवश्यक असल्याचे आदेश राज्याचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिले आहेत.

New rules regarding sale of sweets will come into force from October 1 | मिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू

मिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू

Next
ठळक मुद्देमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागूबेस्ट बिफोर तारीख नमुद करणे बंधनकारक

सांगली : अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी मिठाई विक्रीबाबत नविन नियम लागू केले असून मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रेसमोर/काचेच्या शोकेसवर मिठाईची  Expiry Date (Best Before) नमुद करणे आवश्यक असल्याचे आदेश राज्याचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिले आहेत.

या आदेशाची अमंलबजावणी 01 ऑक्टोबर 2020 पासून करण्यात येणार आहे. तसेच बॉक्समध्ये मिठाई पॅक करणाऱ्या विकेत्यांनाही बॉक्सच्या लेबलवर  Expiry Date (Best Before)  हि तारीख नमुद करणे आता बंधनकारक आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.

दसरा दिवाळी सणामध्ये मिठाई खरेदी करताना ताजी खरेदी करावी. 8 ते 10 तासानंतर मिठाई खाऊ नये. उघड्यावरील मिठाई पदार्थ खरेदी करु नये. परवाना/नोंदणी असलेल्या अन्न व्यवसायिकाकडूनच मिठाई खरेदी करावी. मिठाई खरेदी करताना खरेदी बिलाची मागणी करावी. ख

रेदी केलेल्या मिठाईची साठवणूक योग्य तापमानास/फ्रिजमध्ये करावी. मिठाईवर बुरशी सदृश्य आढळुन आल्यास तीचे सेवन न करता ती नष्ट करावी. पॅकिंगमधील मिठाई खरेदी करताना बॉक्सवर उत्पादकाचा पत्ता, पॅकिंग दिनांक व इी२३ इीाङ्म१ी बघुनच मिठाई खरेदी करावी. ग्राहकांना गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.

Web Title: New rules regarding sale of sweets will come into force from October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.