शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवक कॉँग्रेसमध्ये सकारात्मक राजकारणाचा नवा पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:30 IST

सत्यजित तांबे यांना संधी; विश्वजित कदम यांची समन्वयाची भूमिका

कडेगाव (जि. सांगली) : प्रदेश, जिल्हा व विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी लोकशाही मार्गाने पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून होतात. ही निवडणूक ९, ११ व १२ सप्टेंबररोजी राज्यभरात पार पडली. या निवडणुकीचे पडसाद उमटून पक्षांतर्गत संघर्ष नको, यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजित कदम यांनी राज्यभर समन्वयाची भूमिका घेतली आहे.आ. कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून युवक काँग्रेसअंतर्गत संघर्षाला पूर्णविराम दिला आहे. यामुळे आता युवक काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांना युवक कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. आता केवळ मतमोजणीची औपचारिकता बाकी असल्याची चर्चा आहे. युवक काँग्रेसमध्ये प्रारंभी बूथ कमिटीच्या पदाधिकारी निवडी झाल्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव या पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. अशा परिस्थितीत आमदार विश्वजित कदम यांनी तोडजोडीची भूमिकाघेऊन सत्यजित तांबे यांना प्रदेशाध्यक्ष व आमदार अमित झनक यांना प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्याचे आवाहन केले. या समन्वयामुळे पक्षांतर्गत संघर्ष टळला आहे. आ. कदम यांनी पक्षांतर्गत लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या निवडणुका जिंकून सलग दोनवेळा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळविले होते.राज्यातील राजकारणात काँग्रेसचा संघर्ष भाजपच्या विचारधारेशी आहे. हे लक्षात घेता काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या निवडणुकीत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मला पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यानंतर समन्वय साधून निर्णय घेण्याचे ठरले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि युवक काँग्रेसमधील इच्छुकांशी चर्चा केली. समितीतील पदाधिकारी म्हणून कोणाला घ्यायचे यावर एकत्र बसून शिक्कामोर्तब केले. यातून राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत सकारात्मक संदेश जाईल.- आ. विश्वजित कदम

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेस