शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

Maharashtra Vidhan Sabha 2019 : घराणेशाहीबरोबर यंदा नवे चेहरेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:54 IST

सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण केले. यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचा संमिश्र पट दिसून येत आहे.

ठळक मुद्देघराणेशाहीबरोबर यंदा नवे चेहरेहीआठही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट

अविनाश कोळी सांगली : जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण केले. यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचा संमिश्र पट दिसून येत आहे.जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांचा विचार केल्यास दोन्हीकडेही घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचे संमिश्र चित्र दिसून येते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेने जिल्ह्यातील घराणेशाहीवर प्रचंड टीका केली होती.

भाजप आणि शिवसेना सत्तास्थानी आल्यानंतर त्यांनीही या घराणेशाहीचा पुरस्कार केल्याचे दिसत आहे. घराणेशाहीचा पुरस्कार करताना त्यांचा त्या मतदारसंघातील प्रभाव विचारात घेतला जात आहे. संबंधित घराण्यांनीही लोकांवरील आपला प्रभाव कायम राखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळेच ही अपरिहार्यता भाजप व शिवसेनेनेही स्वीकारली.घराणेशाहीचा पुरस्कार सर्वच पक्षाकडून केला जात असताना, नव्या चेहऱ्यांनाही पसंती देण्याची नवी परंपराही त्यास जोडली जात आहे. गेल्या काही निवडणुकांत अनेक नवे चेहरे जिल्ह्याने निवडले आणि राज्याच्या राजकारणात त्यांना काम करण्याची संधी दिली.यंदाच्या निवडणुकीतही अशा नवीन चेहऱ्यांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राजकारणात कोणताही वारसा नसलेले अनेक चेहरे प्रमुख पक्षांकडून इच्छुक म्हणून पुढे येत आहेत. यातील काहींना संधी मिळाली, तर काहींना अद्याप संधी मिळालेली नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली