शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात नव्या ६५ बसेस दाखल, मात्र भंगारात जाणार १०९ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:09 IST

वर्षभराची यादी तयार : तुलनेने नव्या बसेसची संख्या कमी

प्रसाद माळीसांगली : जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये ६५ नव्या दमाच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. परंतु या वर्षभरात तब्बल १०९ बसेस भंगारात निघणार आहेत. जिल्ह्यातील आगारांसाठी २०० बसेसची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या बसेसपेक्षा कालबाह्य होणाऱ्या बसेसची सख्या अधिक आहे.एसटीने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात ५० टक्क्यांची सवलत आदींमुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी आजही प्रवासी एसटीलाच प्राधान्य देतात. यामुळे एसटीच्या महसुलात सुद्धा वाढ होत आहे. पण, त्या तुलनेत बसेसची संख्या वाढत नाही. यासह जुन्या बसेस कालबाह्य होत आहेत. यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या बसेसवर ताण वाढत आहे.अनेक मार्गांवर बसेस वाढविण्याची तसेच नव्या मार्गावर बसेस सुरू करण्याची मागणी आहे. पण, बसेस संख्या अपुरी असल्याने ती पूर्ण करणे आगारांना शक्य होत नाही. सांगली विभागातील विविध आगारातील १०९ बसेस या वर्षभरात भंगारात जाणार आहेत. तसेच सध्या नव्या ६५ लालपरी बसेस दाखल झाल्या असून अद्याप १३५ नव्या बसेसची मागणी प्रलंबित आहे.

महापालिकेची ई-बसेसेची प्रतीक्षामहापालिका क्षेत्रात ४० सिटी बसेसची सेवा सुरू आहे. महापालिकेकडून ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. ती सेवा लवकरात लवकर सुरू झाल्यास महापालिका क्षेत्रातील सिटी बसेस अन्य मार्गावर वळविणे शक्य होणार आहे.

आगार निहाय दाखल झालेल्या नव्या बसेस (चार्ट)

  • सांगली : १०
  • मिरज : ५
  • विटा : ५
  • इस्लामपूर : १०
  • तासगाव : ५
  • जत : ५
  • आटपाडी : ५
  • कवठेमहांकाळ : ५
  • शिराळा : १०
  • पलूस : ५
  • एकूण : ६०

आर्थिक वर्षात महिन्यानुसार कालबाह्य होणाऱ्या बसेस (चार्ट)

  • एप्रिल : ३,
  • मे : ३
  • जून : ९
  • जुलै : २७
  • ऑगस्ट : ३०
  • सप्टेंबर : १२
  • ऑक्टोंबर : ७
  • नोव्हेंबर : १३
  • डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी (२०२६) : ०
  • मार्च (२०२६) : ५
  • एकूण : १०९

वर्षभरात १०९ बसेच कालबाह्य होणार असल्याने ताण वाढणार आहे. सांगली विभागासाठी नव्या २०० बसेसची मागणी केली आहे. त्यानुसार ६५ बसेस दाखल झाल्या आहेत. पुढील टप्प्यात आणखी काही बसेस दाखल होतील. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली