लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आणि महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्या निवडी गुणवत्तेवर झाल्या आहेत. हे दोघेही पदाधिकारी जिल्ह्यात युवक व महिलांचे प्रभावी संघटन करून पक्षाची ताकद वाढवतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाईक, जाधव यांचा सत्कार युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला प्रदेश सदस्या कमल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील कोरोना संकट काळातही पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजप केंद्र शासनच्या काळात महागाईने आभाळ गाठले आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करायला हवे.
छाया पाटील, कमल पाटील, सुनीता देशमाने, सुवर्णा जाधव, विजयराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाळासाहेब पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संजय पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, सभापती अल्लाउद्दीन चौगुले, किसन जानकर, पूजा लाड, मेघा पाटील, आदी उपस्थित होते.