फोटो ओळी : सांगली येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात विराज नाईक यांचा मंत्री जयंत पाटील यांनी सत्कार केला. यावेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, सदाशिव पाटील, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: शाहू, फुले व आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी चालणाऱ्या पक्षाचे जिल्हा पातळीवर युवक संघटन करण्याची जबाबदारी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो. आगामी काळात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
सांगली येथील पक्ष कार्यालयात त्यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
विराज नाईक म्हणाले, पुरोगामी विचारांचा सातत्याने पुरस्कार करणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पाईक राहण्याचे काम गेल्या तीन पिढ्यांपासून नाईक घराण्याने केले आहे. आजोबा लोकनेते फत्तेसिंग नाईक यांनी शदर पवार यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांच्यानंतर आमदार मानसिंगभाऊ व आता मी पक्षासाठी योगदान देत आहे. आगामी सर्व निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, छाया पाटील, सुष्मिता जाधव, अनिता सगरे, मनोज शिंदे, भरत देशमुख, पूजा लाड आदी उपस्थित होते.