आष्ट्याजवळ अपघातात नवेखेडचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:26 AM2021-03-19T04:26:23+5:302021-03-19T04:26:23+5:30

आष्टा : येथील आष्टा-इस्लामपूर मार्गावर एका पेट्रोलपंपानजीक ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या खड्ड्यात गेल्याने एकजण जागीच ठार झाला. राहुल दिलीप नायकवडी (वय ...

Navekhed youth killed in an accident near Ashtya | आष्ट्याजवळ अपघातात नवेखेडचा युवक ठार

आष्ट्याजवळ अपघातात नवेखेडचा युवक ठार

Next

आष्टा : येथील आष्टा-इस्लामपूर मार्गावर एका पेट्रोलपंपानजीक ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या खड्ड्यात गेल्याने एकजण जागीच ठार झाला. राहुल दिलीप नायकवडी (वय ३२, रा. नवेखेड, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री ८ वाजता घडला.

राहुल नायकवडी हे ट्रॅक्टर (क्र. एमएच १३ डीएक्स ३५४३) घेऊन आष्ट्याहून गावाकडे निघाले होता. आष्टा-इस्लामपूर मार्गावर राज पेट्रोलपंपानजीक ट्रॅक्टर आला असता राहुल यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या खड्ड्यात गेला. या अपघातात राहुलच्या डोक्याला जबर मार लागला व तो जागीच ठार झाला. घटनास्थळी आष्टा पोलीस व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अपघाताची माहिती समजताच दीपक डिसले व पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित सिद्ध करत आहेत.

Web Title: Navekhed youth killed in an accident near Ashtya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.