शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या सलाईनमधून निसर्गप्रेमाचे ठिबक

By admin | Updated: April 23, 2015 00:38 IST

सांगलीतील उपक्रम : शंभरावर झाडे जगविली, ओसाड जागेवर फुलणार हिरवाई...गुड न्यूज

अंजर अथणीकर - सांगली  निसर्गाच्या संगतीने ज्यांचा दिवस उजाडतो, अशा लोकांनी निसर्गाप्रती उतराई म्हणून एक वेगळा उपक्रम सांगलीत सुरू केला. चर्चा, गाजावाजा न करता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी जागा मिळेल तिथे वृक्षलागवडीचे काम हाती घेतले. निसर्गाच्या कुशीतच वसलेल्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात अनेकठिकाणी ओसाड भाग त्यांना दिसत होता. महाविद्यालय प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांनी शंभरावर वृक्षलागवड केली. सलाईनच्या वापरातून त्यांनी ठिबक पद्धतीने ही झाडे जगविली आहेत. विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात श्रीधर धामणीकर, नंदकुमार धामणीकर, गजानन मडीवाळ, डॉ. सचिन उदगावे, डॉ. सौ. उदगावे, मंदा करंदवाडीकर, डॉ. संतोष कल्लोळी, दत्तात्रय हेरडे, दीपक कुंभार, दीपक बाशेल आदी २० ते २५ ज्येष्ठ नागरिक या परिसरात सकाळी फिरण्यास जातात. या परिसरात वृक्ष नसल्यामुळे परिसर तसा ओसाड दिसत होता. त्यामुळे या परिसरात वृक्ष लागवड करावी, अशी कल्पना त्यांना सुचली. रोज फिरत असताना याबाबत चर्चा होत असे. शेवटी एक दिवस सर्वांनी थांबून याबाबत निर्णय घेतला. अनेकांनी आपआपली जबाबदारी उचलण्याचे निश्चित केले. विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांची सर्वांनी भेट दिली. आपल्या परिसरात वृक्ष लागवड झाल्यास आपण स्वागतच करू, असे त्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाने चार ते सहा वृक्षांची जबाबदारी घेऊन संपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेरील बाजूने शंभरहून अधिक वृक्षलागवड केली. यामध्ये आंबा, वड, पिंपळ, बदाम आदी वृक्षांचा समावेश आहे. केवळ वृक्ष लागवड न करता त्यासाठी कुंपणही केले आहे. पावसाळा कसाबसा पार पडला. आता उन्हाची तीव्रता सुरू झाली आहे. यामध्ये झाडे टिकणार नाहीत, असे गृहीत धरून सर्वांनी वृक्षालगत सलाईनची बाटली लावून ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा सुरू केला आहे. मॉर्निंगवॉकला जाणारे घरातून निघतानाच पाच ते सहा लिटरच्या कॅनमध्ये पाणी घेऊन जातात. आपआपल्या वृक्षाभोवती असलेल्या सलाईनच्या बाटलीत पाणी ओततात. त्यामुळे वृक्षांना दिवसभर ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा होतो. यामुळे या वृक्षांचीही चांगली जोपासना झाली आहे. गेली वर्षभर हा ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम सुरू आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीमध्ये दररोज हजारो वृक्षांची उन्हाच्या तीव्रतेत मर होत असताना, या ज्येष्ठांनी मात्र वृक्ष संगोपन कसे करावे, याचा आदर्श घालून दिला आहे. आपण फिरावयास जाणारा परिसर प्रसन्न व हिरवागार असावा, यासाठी आपल्या सहकाऱ्यांना वृक्ष लागवडीची कल्पना सुचली. प्रत्येकाने वर्गणी काढली. आपण पाण्यासाठी सर्वांना कॅन पुरवले. वृक्ष लागवडीतूनही आपणाला आनंद मिळत आहे. - दिलीप धामणीकर, वृक्षप्रेमी, सांगली