शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

शहर सुधार समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:19 IST

सांगली जिल्हा सुधार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यात

ठळक मुद्देशरद पवारांशी प्राथमिक चर्चा : जयंतरावांशी चर्चेनंतर निर्णय होणार

सांगली : सांगली जिल्हा सुधार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यात दिल्लीमध्ये प्राथमिक चर्चाही झाली. सुधार समितीने गेल्या काही वर्षात महापालिका क्षेत्रात चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे सुधार समितीचे राष्ट्रवादीत विलिनीकरण व्हावे, यासाठी गळ टाकण्यात आला आहे. पण अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

जिल्हा सुधार समितीने गेल्या काही वर्षांत महापालिका क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापालिकेतील अनेक घोटाळ्यांची मालिका समितीने उघडकीस आणली. घनकचरा प्रकल्प, निविदेतील घोळ, रस्ते, गटारींची निकृष्ट कामे अशा अनेक मुद्द्यांवर सुधार समितीने रान पेटविले होते. महापालिका प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांना समितीने नाकीनऊ करून सोडले होते. घनकचरा प्रकल्पासाठी समितीने हरित न्यायालयातही धाव घेतली होती. त्यामुळेच हरित न्यायालयाने महापालिकेला ४२ कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. गेल्या आॅगस्टमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सुधार समितीने उमेदवार उभे केले होते. समितीला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी, काही प्रभागात त्यांच्या उमेदवारांना चांगलीच मते मिळाली होती.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर भाजप विरोधकांना एकत्र आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रातील सुधार समितीनेही राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार व समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असली तरी, अद्याप समितीने राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत होकार दिलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. पाटील यांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.समितीला हवी मोकळीकसुधार समितीने महापालिका क्षेत्रात जम बसविला असला तरी, पक्षीय पाठबळाशिवाय त्यांच्या कार्याला भरारी मिळालेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत सकारात्मक निर्णयाची शक्यता अधिक आहे. त्यातही समितीने गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार, अनियमितता या मुद्द्यांवर आंदोलन केले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना पक्षीय बंधनात मर्यादा येणार आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश केल्यानंतरही समितीला आपले काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. त्यावर प्रवेशाचा निर्णय होणार आहे.

समितीला हवी मोकळीकसुधार समितीने महापालिका क्षेत्रात जम बसविला असला तरी, पक्षीय पाठबळाशिवाय त्यांच्या कार्याला भरारी मिळालेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत सकारात्मक निर्णयाची शक्यता अधिक आहे. त्यातही समितीने गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार, अनियमितता या मुद्द्यांवर आंदोलन केले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना पक्षीय बंधनात मर्यादा येणार आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश केल्यानंतरही समितीला आपले काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. त्यावर प्रवेशाचा निर्णय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली