शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मतदार दिवस-मतदारांनी सहकार्य करावे : डॉ. स्वाती देशमुख-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:49 IST

राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय मतदार दिवस-मतदारांनी सहकार्य करावे : डॉ. स्वाती देशमुख-पाटीलनिवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंचाची स्थापना

सांगली : राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.

भारत निवडणूक आयोग, प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेशानुसार दिनांक 25 जानेवारी 2020 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार व नव युवक, युवती यांनी आपल्या रहिवाशी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहवे, असे आवाहन डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी केले.राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयाचे प्रमुख, महाविद्यालयीन प्राचार्य, एनसीसी, एनएसएस, एनवायके प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंचाची स्थापना करून मतदार व मतदान प्रक्रियेबाबत जागृती करण्याबाबत आवाहन करण्यात आले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील म्हणाल्या, दिनांक 25 जानेवारी 2020 हा दिवस 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाने  Electoral Literacy for Stronger Demoracy  हा विषय घोषित केला आहे.

या दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सांगली येथील स्टेशन चौकात मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्टेशन चौक ते पुष्कराज चौक व परत स्टेशन चौक पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. 

टॅग्स :Votingमतदानcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली