शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Sangli: भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर नांगोळे ग्रामपंचायत प्रथम

By अशोक डोंबाळे | Updated: January 27, 2024 13:40 IST

सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत घेतलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील ...

सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत घेतलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीस प्रथम, बोरगाव ग्रामपंचायतीस द्वितीय तर तासगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख अशी बक्षिसाची रक्कम आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांनी दिली.गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील योजनेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या १२ जिल्ह्यांतील २७० ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा झाली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरांवर केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत नांगोळे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले असून द्वितीय बोरगाव ग्रामपंचायतीस द्वितीय क्रमांकाचे ३० लाख आणि वडगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचे २० लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत