शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या नागपूजनाने शिराळ्यात नागपंचमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:21 IST

अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि पावसाच्या सरींच्या हजेरीत शिराळ्यामध्ये नागपंचमी उत्सवास सुरुवात झाली. महिलांनी नागाच्या प्रतिमेचे, मातीच्या नागांचे पूजन करून उपवास सोडला.

शिराळा (जि. सांगली) - ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि पावसाच्या सरींच्या हजेरीत शिराळ्यामध्ये नागपंचमी उत्सवास सुरुवात झाली. महिलांनी नागाच्या प्रतिमेचे, मातीच्या नागांचे पूजन करून उपवास सोडला. राज्य-परराज्यातून आलेल्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन न झाल्याने नाराजी दिसून येत होती. गेल्या काही वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशानुसार, जिवंत नाग पकडण्यास आणि त्यांच्या पूजेस बंदी घालण्यात आली आहे.शिराळा व नाग यांचे नाते अतूट आहे. नागपंचमीमुळे देशातच नव्हे, तर परदेशातही शिराळा शहराची ओळख निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी सहापासून अंबामाता मंदिरात भाविक, नागमंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नागमंडळे वाजतगाजत नागाची प्रतिमा घेऊन मंदिरात येत होते. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने संपूर्ण शिराळा दुमदुमून गेले होते.दुपारी १२च्या दरम्यान महाजन यांच्या घरामध्ये मानाच्या पालखीचे पूजन मानकऱ्यांनी केले. त्यानंतर, पालखी उचलण्यात आली. ती उचलण्याचा मान भोई समाजाकडे असतो. नागाचा मान कोतवालांकडे आहे. पालखी आणि मातीच्या नागाची पूजा करून ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आल्यावर मिरवणुकीस सुरुवात झाली.मंदिर परिसर गजबजलाही मिरवणूक होळीचा टेक, गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, मेन रोड आदी मार्गांवरून अंबामाता मंदिराजवळ आल्यावर तिची सांगता झाली. अंबामाता मंदिर परिसर व नाग स्टेडियम परिसर पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ आदी विक्रेत्यांनी गजबजलेला होता.

टॅग्स :Sangliसांगलीnewsबातम्या