शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:25 IST

सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता.

इस्लामपूर : वाळवा विधानसभा मतदार संघातून सन १९७८ मध्ये प्रा. एन. डी. पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात जनता पक्षाकडून राजारामबापू पाटील, काँग्रेसकडून विलासराव शिंदे अशी तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी ठरली होती. यामध्ये विलासराव शिंदे निवडून आले. परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन झाले. यामध्ये एन. डी. पाटील यांचा पराभव होऊनही त्यांना सहकारमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर काही कालावधीतच जनता पक्षाचे राजारामबापू पाटील यांचा महसूलमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.एन. डी. पाटील यांनी सहकारमंत्री असताना सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर मोठा भर दिला होता. सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता. सहकारातील कामाबरोबरच त्यांनी शेतीच्या क्षेत्रातही मोठे काम केले आहे. शासनाच्या कृषी विभागामध्ये नोकरभरती करताना कृषी पदविका आणि पदवीधरांना प्राधान्य देण्याचे धोरण त्यांच्याच काळात अवलंबिले.प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची जन्मभूमी वाळवा तालुक्यातील ढवळी या गावात आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत: कोल्हापूर हीच आपली कर्मभूमी मानून त्यांनी जनसामान्यांसाठी अनेक लढे उभे केले. समाजातील पीडित, वंचित घटकांसह कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या या योध्दाच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण वाळवा तालुका त्यांच्या आठवणीने शोकसागरात बुडाला.

टॅग्स :SangliसांगलीN D Patilप्रा. एन. डी. पाटील