शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार होणार! बेळगावच्या संघटनांचाही आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:42 IST

दक्षिण-प्श्चिम विभागाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाडी म्हैसूरमधून सध्याच्या रात्री साडेदहाऐवजी दीड तास अगोदर म्हणजे नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये पहाटे ७.१० ऐवजी साडेसहा वाजता येईल. बेळगावमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता व मिरजेत दुपारी १.२० वाजता पोहोचेल. मिरजेतून दुपारी ३.१० वाजता परतीचा प्रवास सुरु होईल.

ठळक मुद्दे रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक

सांगली : म्हैसूर ते धारवाड एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेळगावातील प्रवासी संघटनांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना याबाबत साकडे घातले आहे.म्हैसूर ते धारवाड एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १७२०१) दररोज धावते. ती मिरजेपर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या दक्षिण-प्श्चिम विभागाने गेल्या जून महिन्यात तयार केला. तो हुबळी आणि म्हैसूर विभागीय व्यवस्थापकांना पाठवला. यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना पुढाकार घेतला होता.

हा प्रस्ताव बेळगावमधील प्रवासी संघटनांनी उचलून धरत ही एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे. मिरजेत दहा मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे सांगलीला येईल व अर्धा तासांच्या विश्रांतीनंतर परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होईल, असा प्रस्ताव आहे. सांगलीतून थेट बेळगाव-म्हैसूरसाठी सुटणारी गाडी नाही. त्यामुळे राज्यमंत्री अंगडी या विस्ताराबाबत सकारात्मक असल्याचे संघटनांनी सांगितले.मिरजेत सध्या गाड्यांसाठी पुरेसे प्लॅॅटफॉर्म उपलब्ध नाहीत. सांगलीत तीन प्लॅटफॉर्म व तीन अतिरिक्त लूप लाईन्स असल्याचा फायदा प्रस्तावित एक्स्प्रेसला मिळेल. यापूर्वी सांगली बेळगाव-पॅसेंजरचाही प्रस्ताव होता, पण पुणे विभागाने तांत्रिक कारण देऊन तो नाकारला. त्याऐवजी आता म्हैसूर-सांगली एक्स्प्रेससाठी विचार सुरू आहे.

दक्षिण-प्श्चिम विभागाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाडी म्हैसूरमधून सध्याच्या रात्री साडेदहाऐवजी दीड तास अगोदर म्हणजे नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये पहाटे ७.१० ऐवजी साडेसहा वाजता येईल. बेळगावमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता व मिरजेत दुपारी १.२० वाजता पोहोचेल. मिरजेतून दुपारी ३.१० वाजता परतीचा प्रवास सुरु होईल. बेळगावमध्ये संध्याकाळी ५.४०, हुबळीमध्ये रात्री ९.३५ व म्हैसूरमध्ये सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. यात थोडा बदल करुन एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी दिली.

 

‘म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तेदेखील सकारात्मक आहेत. नव्या गाड्या सुरू करणे किंवा सध्याच्या गाड्या विस्तारित करणे याचे अधिकार आता सरव्यवस्थापकांकडे आल्याने म्हैसूर-सांगली एक्स्प्रेससाठी रेल्वे बोर्डाच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे नवी एक्स्प्रेस लवकरच धावू शकते’.- प्रा. कृष्णा आलदर, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीbelgaonबेळगाव