शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:42 IST

महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, सर्व रुग्ण बरे होतील', अशा शब्दात ट्विट करत दिलासा दिला.

ठळक मुद्देमुस्तफा, काळजी करु नकोस, सर्व कोरोनाबाधित बरे होतील!जयंत पाटील यांनी ट्विट करुन दिलासा

सांगली : महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलजयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, सर्व रुग्ण बरे होतील', अशा शब्दात ट्विट करत दिलासा दिला.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत 25 जानेवारी 2019 रोजी सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे व्यवस्थापन इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर व त्यांचे सहकारी करतात. शहरासह जिल्ह्यातील बेघरांना सावली देण्याचे काम या केंद्रातून होते. दीनदयाळ अंतोदय योजनेतून केंद्र सरकारकडून निवारा केंद्राला निधी उपलब्ध होतो. शिवाय समाजातील दानशूर लोकही या बेघरांच्या मदतीला धावून येत असतात.

 

गेल्या दीड वर्षात अनेकांनी आपले वाढदिवस या निवारा केंद्रातील बेघरांसोबत साजरे केले आहेत. दिवाळी, रमजान, गणेशोत्सव अशा अनेक मोठ्या सणावेळीही लोक बेघरांना मदतीचा हात देत असतात. या केंद्रात ५७ बेघर व ८ कर्मचारी आहेत.राहतात. लॉकडाऊनमुळे बेघरांची संख्या वाढली होती. केंद्रातील एकाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर सावली केंद्रातील ५७ बेघर व कर्मचाऱ्यांचे हे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या ५७ पैकी ४७ बेघर व ४ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सावली केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजताच महापालिकेची यंत्रणा हादरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करत इन्साफ फाउंडेशनचे संचालक मुस्तफा मुजावर यांना दिलासा दिला.जयंत पाटील यांचे ट्विटइन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर हे सावली बेघर निवारा केंद्रात अनाथ, बेघर लोकांना निवारा देत त्यांची काळजी घेतात. आज या केंद्रावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. मात्र मुस्तफा यांची सेवा अखंड सुरू आहे. मुस्तफा, काळजी करू नका. येथील सर्व रुग्ण लवकरच बरे होतील!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली