शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:22 IST

हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.

मिरज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यभरात विविध ठिकठिकाणी पोवाड्याचे, व्याख्यानाचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिवजयंतीच्या मुख्य दिनी सकाळपासूनच सर्वत्र शिवमय वातावरण झाले आहे. रस्त्यावर शिवज्योत घेवून जाणारे तरुणाचे जथ्ये, चौकाचौकात भगवे झेंडे, गडकोटांच्या प्रतिकृती, विद्युत रोशनाईने शहर परिसर सजले आहेत.तर आज सकाळपासून जन्मकाळ सोहळा, व्याख्याने, पोवाडे आदी विविध कार्यक्रम, उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. जात, धर्म या पलिकडे जाऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरजेतील मुस्लिम महिलांनीही उत्साहात साजरी केली. हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुमय्या रोहिले, आफ्रीन रोहिले, शहनाज मुल्ला, तबस्सुम रोहिले, नजो शिलेदार आदी उपस्थित होते.  सुमय्या रोहिले म्हणाल्या, महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना प्रचंड आदर होता. महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच नव्हता. कर्नाटकातील बहुचर्चित हिजाबचे प्रकरण देशाच्या हिताचे नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या राज्यांमध्ये राहतो याचा अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीShivjayantiशिवजयंतीMuslimमुस्लीमWomenमहिला