शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील खूनप्रकरण : हाताच्या ठशावरुन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 15:15 IST

सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांचा पुढील तपास थांबला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे हाताच्या ठशावरुन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्नसांगलीतील खूनप्रकरण : आधारकार्ड तपासणी होणार

सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू शकते. खून होऊन सहा दिवस होऊ गेले तरी त्याची ओळख पटली नसल्याने पोलिसांचा पुढील तपास थांबला आहे.रविवारी दि. ३० सप्टेंबर रोजी मृत तरुणावर काठी व दगडाने हल्ला करुन खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विजयनगरमधील यशवंतराव होळकर चौकातील ह्यअथर्वह्ण बंगल्यासमोर फेकून दिला होता. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.

मृतदेहाची ओळख पटेल, असे काहीच सापडले नव्हते. केवळ राखी बांधलेला एक धागा हातात होता. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण केले. श्वान पर्ल हॉटेलपासून दोनशे मीटर अंतर व विश्रामबाग रेल्वे स्थानकापर्यंत गेले. याठिकाणी मृताचे रक्ताचे डाग सापडले. यावरुन त्याला दोन ते तीन ठिकाणी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले.

मृतदेहाच्या छायाचित्रावरुन त्याची सांगली, कोल्हापूर, सातारासह कर्नाटकात ओळख पटविण्याचा प्रयत्न केले. या वर्णनाची व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे का, याची तपासणी करण्यात आली. पण काहीच सुगावा लागला नाही. प्रसारमाध्यमातूनही अनोळखी तरुणाच्या खुनाचे वृत्त दोन-तीन दिवस प्रसिद्ध झाले. हे वाचूनही कोणी पुढे आली नाही. त्यामुळे मृत तरुण परराज्यातील असावा, अशीही शक्तता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिस