शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इस्लामपुरात किरकोळ कारणावरून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:32 IST

Murder Sangli Police- इस्लामपूर शहरातील उरुण परिसरातील नवेखेड रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला.शेतातील पाण्याच्या वादातून हा प्रकार झाला.यातील हल्लेखोर फरार झाला आहे.

ठळक मुद्देइस्लामपुरात किरकोळ कारणावरून एकाचा खून हल्लेखोर पाटील याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना

इस्लामपूर: शहरातील उरुण परिसरातील नवेखेड रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली.हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला.शेतातील पाण्याच्या वादातून हा प्रकार झाला.यातील हल्लेखोर फरार झाला आहे.अशोक आनंदराव पाटील (४३,रा.साखराळे,ता.वाळवा) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.तर प्रशांत बाबुराव पाटील (रा.उरुण)असे हल्लेखोराचे नाव आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नवेखेड रस्त्यावर सुरज पाटील यांच्या शेतात अशोक पाटील हा काम करत होता.तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या नवरा-नवरी सहकारी पाणी पुरवठा संस्थेत पाटकरी म्हणूनही काम करायचं. सुरज पाटील यांच्या शेताला या लागूनच हल्लेखोर प्रशांत पाटील याचे क्षेत्र आहे.प्रशांत पाटील याच्या शेतात पाणी जाते यावरून हा वाद झाला.दोन दिवसांपूर्वी या वादावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक झाली होती.त्यामध्ये दोघांची वादावादी झाली होती. तसेच दोन दिवसात शेतात जाणारे पाणी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले होते.आज अशोक पाटील हा शेतात काम करत असताना प्रशांत पाटील हा तेथे आला.रागाच्या भरात त्याने अशोक पाटील याला लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.त्यातील एक फटका अशोक पाटील याच्या डोक्यात वर्मी बसल्याने तो जाग्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला.

डोक्यात घाव बसल्याने तो जागीच गतप्राण झाला.त्यानंतर हल्लेखोर प्रशांत पाटील याने घटनास्थळावरून पलायन केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.गुन्ह्याची सर्व माहिती घेत त्यांनी हल्लेखोर पाटील याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSangliसांगली