सुरेंद्र दुपटे
संजयनगर/ सांगली: संभाव्य आपत्तीसाठी सांगली महापालिका अग्निशामक विभाग सज्ज झाला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक विभागाकडून आज आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्या सर्वच साहित्याची तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती हाती घेतली आहे.मागील महापुराचा काळात अग्निशमन विभागाच्या सर्व आपत्कालीन यंत्रणांच्या मदतीने नागरिकांना मदतीबरोबर अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा करण्यात आली. यामुळे अनेकांना वेळीच बाहेर काढता आले. या महापुरानंतर अनेक आवश्यक साहित्य खरेदी करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण केले आहे.
सध्या पावसाळा सुरू होत असल्याने पुराची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मनपा आयुक्त कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला सज्जतेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आज आपल्या विभागाकडे असणाऱ्या सर्व आपत्कालीन वेळी वापरात येणाऱ्या सर्व साहित्यांची तांत्रिक तपासणी केली. यामध्ये यांत्रिक बोटीबरोबर त्यासोबत असणाऱ्या मशीनचीसुद्धा तपासणी करण्यात आली. यामध्ये तांत्रिक तपासण्या करीत अग्निशमन विभागाने सर्वच यंत्र सामग्री सज्ज ठेवली आहे.
अग्निशामन विभागाकडील उपलब्ध साधन सामुग्री
- फायर टेंडर ६
- रेस्क्यू व्हँन १
- लाईफ जँकेट १ हजार
- यांत्रिक बोटी ११
- रबर बोटी 3
- मनुष्य बळ ६० जवान
- लाईफ रिंग १७
- अग्निशामन उपकरणे 2४