शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली

By घनशाम नवाथे | Updated: June 9, 2025 22:08 IST

उपायुक्त वैभव साबळे याला ७ लाख रूपयांच्या लाचेच्या मागणीबद्दल अटक केल्यानंतर या कारवाईचे समाज माध्यमावरून स्वागत करण्यात आले.

- घनशाम नवाथे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीत २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा. ग्रीन एकर्स, फ्लॅट नं. ४०३, धामणी रस्ता, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सोमवारी केलेल्या कारवाईनंतर महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली.

तक्रारदार तानाजी रूईकर (रा. मिरज) यांच्या कंपनीने सांगलीतील सी.के. असोसिएटस् यांच्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना घेण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता. हा परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने वरिष्ठांचे नाव सांगून १० लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे रूईकर यांनी दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. तेव्हा उपायुक्त साबळे याने तक्रारदार रूईकर यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ लाख रूपये स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.

उपायुक्त साबळे याने ७ लाख रूपये लाचेची मागणी केली. परंतू त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर प्रत्यक्षात ७ लाख रूपये लाच स्विकारली नाही. परंतू त्याने ७ लाखाची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला.

दरम्यान वरिष्ठ कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर उपायुक्त साबळे याच्याविरूद्ध कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नूतन उपअधीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी महापालिकेतून साबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

उपअधीक्षक कटके, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलिम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पाेपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमाेडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

कारवाईनंतर फटाके वाजवलेउपायुक्त वैभव साबळे याला ७ लाख रूपयांच्या लाचेच्या मागणीबद्दल अटक केल्यानंतर या कारवाईचे समाज माध्यमावरून स्वागत करण्यात आले. तर महापालिकेच्या मंगलधाम शॉपिंगसेंटरमधील कार्यालयासमोर काहींनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

सातारा, सांगलीतील घराची झडतीवैभव साबळे हा मुळचा सातारा येथील आहे. सध्या सांगलीत धामणी रस्ता येथे ग्रीन एकर्समध्ये राहत होता. लाचेच्या मागणीच्या कारवाईनंतर साबळे याच्या सातारा व सांगलीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी झडती घेतली.

वरिष्ठांसाठी मागितली लाचउपायुक्त वैभव साबळे याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यास देण्यासाठी म्हणून लाचेची मागणी केली होती असे तक्रारीत म्हंटले आहे. पडताळणीत संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्षात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही. परंतू या वरिष्ठ अधिकाऱ्याची समाज माध्यमावर चर्चा मात्र रंगली होती.

मुंबईच्या पथकाची चर्चालाचलुचपत प्रतिबंधक विभागात मुंबईहून उपअधीक्षक अनिल कटके दाखल झाले आहे. गुरूवारी सांगलीत त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर सोमवारी कारवाईचे आदेश आल्यामुळे ते सहभागी झाले. परंतू मुंबईच्या पथकाने कारवाई केल्याची चर्चा रंगली होती.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSangliसांगली