शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे : सांगलीत बैठक , महापौरांसह नगरसेवकांकडून झाडाझडती; स्वच्छता निरीक्षक-मुकादमात समन्वयाबद्दल संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:17 IST

सांगली : महापालिका हद्दीत डेंग्यू, चिकुनगुन्या साथींचे वाढते प्रमाण, कचरा उठाव तसेच स्वच्छतेबाबतची उदासीनता, नादुरुस्त घंटागाड्या, स्वच्छता निरीक्षक, मुकादमात समन्वयाचा अभाव

ठळक मुद्देविस्तारित भागात तीन-चार दिवसांतून एकदा कचरा उठाव होतो. वाहनात डिझेलच नसते रुग्णालय सांभाळून कचरा उठाव व स्वच्छतेचे काम कधी करणार?

सांगली : महापालिका हद्दीत डेंग्यू, चिकुनगुन्या साथींचे वाढते प्रमाण, कचरा उठाव तसेच स्वच्छतेबाबतची उदासीनता, नादुरुस्त घंटागाड्या, स्वच्छता निरीक्षक, मुकादमात समन्वयाचा अभाव यावरून शुक्रवारी महापौर, स्थायी सभापतींसह नगरसेवकांनी आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले. वरिष्ठ अधिकाºयांचेच नियंत्रण नसल्याने आरोग्य यंत्रणा मोकाट झाली आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्याचा सल्लाही देण्यात आला.

महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नगरसेवक सुरेश आवटी, राजेश नाईक, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, संजय बजाज, विष्णू माने, युवराज गायकवाड, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे, संगीता खोत यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आरोग्याधिकारी, मुकादम उपस्थित होते.कचरा उठाव करणाºया घंटागाड्या नादुरुस्त आहेत. घंटागाडीला चाके नाहीत. पत्रे फाटले आहेत. कचरा उठावच्या वाहनावर प्रशासनाचे नियंत्रणच नाही. अनेक वाहने बंद पडलेली आहेत.

विस्तारित भागात तीन-चार दिवसांतून एकदा कचरा उठाव होतो. वाहनात डिझेलच नसते. जेसीबीची विचारणा केली तर, कचरा डेपोवर जेसीबी असतो, नाही तर महापौरांच्या प्रभागात, अशी उत्तरे दिली जातात. औषध फवारणी होत नाही. मुकादम, स्वच्छता निरीक्षक कामच करीत नाहीत. मिरजेत तर एकच औषध फवारणीचा ट्रॅक्टर आहे. पूर्वी घंटागाड्या दररोज फिरत होत्या. आता का नाही?, असा जाब नागरिक विचारतात. नगरसेवकांपेक्षा आरोग्य विभागातच अधिक राजकारण आहे. डॉ. आंबोळेंना ८५ हजार पगार आहे, पण त्यांना काहीच अधिकार नाहीत. सहाय्यक आरोग्याधिकारी नियुक्त केले आहेत, पण ते रुग्णालय सांभाळून कचरा उठाव व स्वच्छतेचे काम कधी करणार? असा सवालही नगरसेवकांनी केला.

स्थायी सभापती सातपुते यांनी तर अधिकाºयांना धारेवरच धरले. ते म्हणाले की, वाहनांना नवीन टायर बसविले आहेत. तरीही वाहने पंक्चर कशी होतात? वाहनांतील डिझेल चोरीचा उद्योग सुरू आहे. ते कुठे तरी थांबले पाहिजे. डिझेल चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांना घरी घालवावे लागेल. जेसीबी जागेवर नसतो. औषध फवारणी होत नाही. आरोग्य विभागाकडून फक्त कारण सांगून काम टाळले जात आहे. केवळ नगरसेवकांना खेळवत ठेवण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाअधिकाºयांना प्रभाग दत्तक देणारस्वच्छता, कचरा उठावावरून महापालिकेची ही बैठक वादळी ठरली. नवीन वर्षापासून आरोग्य सप्ताह सुरू करण्याचा निर्णय उपायुक्तांनी जाहीर केला. तसेच शाळा दत्तक योजनेच्या धर्तीवर प्रत्येक अधिकाºयाला स्वच्छतेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभाग दत्तक देण्यात येतील, असेही सांगितले. स्वच्छता निरीक्षकांनी दररोजच्या कामाचा आराखडा तयार करून तो प्रभागा फलक लावून प्रसिद्ध करावा. तसेच नगरसेवकांनाही कामाची माहिती द्यावी. डेंग्यू, चिकुनगुन्याचे रुग्ण सापडतात, पण त्या प्रभागातील नगरसेवकांनाच त्याची माहिती नसल्याचे दिसून येते. यावरून समन्वयाचा अभाव स्पष्ट होतो, अशी कबुली देत, स्वच्छता निरीक्षकांकडील ना हरकत दाखला देण्याचे अधिकार काढून घेतले जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले. .सहाय्यक आरोग्य अधिकाºयांना मूळ जागी पाठवूबैठकीत सहाय्यक आरोग्य अधिकाºयांच्या निष्क्रियतेवर नगरसेवकांनी हल्लाबोल केला. अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी, चार प्रभाग समित्यांकडून सहाय्यक आरोग्य अधिकाºयांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यात येईल, अशी हमी दिली. आरोग्य विभागाकडे शासनाचा अधिकारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. राम हंकारे यांचा प्रस्तावही पाठविला आहे, पण तो अद्याप प्रलंबित आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली