शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महापालिकेचे अंदाजपत्रक ५0३ कोटींच

By admin | Updated: February 27, 2015 00:50 IST

करवाढ नाही : उद्यानांना प्रवेश शुल्क, पाणीपट्टीत ड्रेनेजचा कर; ७९ लाख शिलकीचे अंदाजपत्रके

सांगली : कोणतीही करवाढ नसलेले ५0३ कोटी ७२ लाख ९७ हजार ३00 रुपयांचे आणि ७९ लाख शिलकीचे प्रशासकीय अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी आज, गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सादर केले. पाणीपट्टीत वार्षिक बिलाच्या २0 टक्के ड्रेनेज उपभोक्ता शुल्क आकारणीसह सुस्थितीत असलेल्या उद्यानांना पाच रुपये प्रवेश शुल्क आकारण्याची शिफारस या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाकडे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांसह महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले होते. महापालिका आयुक्तांनी २0१५-१६ या आर्थिक वर्षाचे हे करवाढ नसलेले अंदाजपत्रक आज सादर केले. आगामी वर्षात महसुली व भांडवली जमा ५0३ कोटी ७२ लाख ९७ हजार ३00 रुपये अपेक्षित असून ५0२ कोटी ९४ लाख १३ हजार २00 रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात ७९ लाख रुपये शिल्लक राहील, असा अंदाज आहे. या अंदाजपत्रकात शासकीय भांडवली रकमांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शासकीय भांडवली रकमेवरच हे अंदाजपत्रक अवलंबून आहे. उत्पन्नाचे अन्य स्रोत मजबूत करतानाच खर्चातील काटकसरीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. उत्पन्न वाढीसाठी भविष्यात ड्रेनेज उपभोक्ता कर पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल करण्याचे सुचविण्यात आले आहे. वार्षिक पाणीपट्टीत साधारण ४00 रुपये हा कर द्यावा लागेल. ड्रेनेजच्या सुविधांवरील वार्षिक खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न यात १0 कोटी रुपयांची तूट आहे. पाणीपट्टीत जर उपभोक्ता कर लावला, तर महापालिकेस वार्षिक अडीच ते साडेतीन कोटी रुपये मिळू शकतात व तूट कमी होऊ शकते. कोल्हापूरसह राज्यातील अन्य महापालिकेत असा कर लावण्यात आला आहे. त्यामुळे येथेही हा कर लावण्याचे सुचविण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील आमराई उद्यान, बापट बाल उद्यान यासारख्या सुस्थितीत असणाऱ्या सर्व उद्यानांमध्ये पाच रुपये प्रतीदिन व मासिक २५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. नाममात्र प्रवेश शुल्कामुळे नागरिकांना मोठा भार पडणार नाही व महापालिकेच्या उद्यानांची सुधारणा अशा करांतून करता येऊ शकेल. शहरातील अनेक उद्यानांची किरकोळी दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)पुन्हा खासगी एजन्सी एचसीएल कंपनीने नागरी सुविधा केंद्रे बंद केली आहेत. या कंपनीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर वार्षिक १ कोटी ४0 लाख रुपयांचा भार पडत होता. महिन्याकाठी साधारण १0 ते १२ लाख रुपये खर्च महापालिकेस येत होता. सध्या ही यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात आहे. आगामी वर्षात अन्य दुसरी संस्था या कामासाठी नियुक्त केल्यास वार्षिक खर्च जास्तीत जास्त ६0 लाख रुपये येऊ शकतो. म्हणजेच या गोष्टीमुळे एचसीएलच्या तुलनेत महापालिकेचे वार्षिक ७0 ते ८0 लाख रुपये वाचतील. त्यामुळे संस्था नियुक्तीबाबत विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. घरपट्टीत कोणताही बदल नाहीघरपट्टी विभागाची सध्याची आकारणी योग्य आहे. वसुलीबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. अनधिकृत बांधकामांना दुप्पट घरपट्टी आकारून दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे. मागील थकबाकी गोळा करताना नव्याने घरपट्टीचे सर्वेक्षण करून करातील गळती दूर करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. क्रीडा संचालनालयाकडे सादर करण्यासाठी महापालिकेने ३८ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. क्रीडांगण परिसर विकास योजनेतून दुरुस्ती व व्यावसायिक गाळ्यांचे नूतनीकरण करून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयुक्तांनी अंदाजपत्रकात म्हटले आहे.