शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

अमृत योजनेतून महापालिकेस २५० कोटी

By admin | Updated: October 1, 2015 00:43 IST

शासनाची तत्त्वत: मान्यता : कुपवाड ड्रेनेज, मिरज पाणी पुरवठ्यासाठी प्रस्ताव

सांगली : राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेत सांगली महापालिकेचा समावेश झाला आहे. कुपवाड ड्रेनेज योजना व मिरजेतील सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेज व पाणी पुरवठ्याचा प्रश्न बऱ्याचअंशी मार्गी लागणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीत पात्र ठरू न शकलेल्या सांगली महापालिकेचा केंद्र शासनाच्या अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील इतर महापालिकांनी अमृत योजनेसाठी पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असताना, सांगलीत मात्र याबाबत शांतता होती. महिन्याभरापूर्वी नगरविकास खात्यातून महापालिकेला दूरध्वनी आल्यानंतर प्रशासन जागे झाले. तातडीने राज्य शासनाकडे साडेचारशे कोटींचा प्रस्ताव सादर केला. यात कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी १२८ कोटी, मिरजेच्या सुधारित पाणी योजनेसाठी ११८ कोटी, त्याशिवाय उद्याने विकास, पावसाळी पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था, सध्या पण अपूर्ण पाणी व ड्रेनेज योजनेसाठी २१९ कोटी असा पाच वर्षांचा कृती आराखडा शासनाला सादर केला होता. यापैकी कुपवाड ड्रेनेज व मिरज पाणी योजनेच्या प्रस्तावाला शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. गिरी यांनी दिली. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २५ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित २५ टक्के निधीची महापालिकेला तरतूद करावी लागणार आहे. कुपवाड ड्रेनेजचा प्रश्न गेली काही वर्षे गाजत आहे. सांगली व मिरजेची योजना मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली; पण कुपवाडची योजना तांत्रिक कारणांमुळे फेटाळली होती. गेल्या पाच वर्षात वारणा उद्भव व सुजल निर्मल योजनेतून सांगली व कुपवाडच्या पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने ड्रेनेजचा सुधारित प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने कुपवाडचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी) ६५ कोटींची गरजअमृत योजनेतून ड्रेनेज व पाण्यासाठी अडीचशे कोटी मिळणार आहेत. त्यापैकी २५ टक्के रकमेची म्हणजे जवळपास ६५ कोटींची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती व अपूर्ण योजनांचा पांढरा हत्ती सांभाळतानाच प्रशासनाला नाकीनऊ आले आहे. त्यात आणखी निधीची तरतूद करताना मोठी कसरत होणार आहे.