शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगलीची संधी मुंबईने हिरावली

By संतोष भिसे | Updated: October 2, 2023 12:32 IST

सांगलीकरांचा सहभाग पाहुण्या कलाकारापुरताच

संतोष भिसेसांगली : शंभराव्या मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाची सांगलीची संधी मुंबईने हिरावून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नाट्यपरिषदेचे तहयात विश्वस्त व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमेलनाचा मुख्य कार्यक्रम मुंबईत घेण्याची सूचना केली आहे; त्यामुळे सांगलीकरांचा सहभाग फक्त पाहुण्या कलाकारापुरताच मर्यादित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.मुंबईत नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत पवार यांनी संमेलनाचा मुख्य कार्यक्रम मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावा, अशी सूचना केली. यानिमित्ताने शंभराव्या संमेलनाला साजेसे कार्यक्रम मुंबईत घेता येऊ शकतील, असेही ते म्हणाले. पवार यांची सूचना परिषदेकडून डावलली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुख्य संमेलन मुंबईतच होण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची नाट्यप्रेमींना तीन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. कोरोनाकाळात तीन वर्षे ते झाले नव्हते. त्यानंतर परिषदेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांमधील लाथाळ्यांमुळेही लांबले होते. निवडणुकीनंतर प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली नियामक मंडळ सत्तेत आले पण आता पावसाळा, दसरा-दिवाळी व शाळा-महाविद्यालयांचा परीक्षांचा काळ याचा विचार करून पुढील वर्षी मार्चमध्ये संमेलन घेण्याचे नियोजन आहे. कोरोनापूर्वीच्या काळात झालेल्या निवडीनुसार डॉ. जब्बार पटेल हेच अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाची रूपरेषा आखण्यासाठी समन्वय समिती स्थापना करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम नसतीलयापूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांनी तंजावरसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सांगलीत मुख्य सोहळा निश्चित केला होता. नव्या नियामक मंडळाने मात्र विभागनिहाय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नाट्यपंढरी’ म्हणून सांगलीत मात्र एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकेल. अर्थात, त्यामध्ये सांगलीकर पाहुणे कलाकारच असतील.

बोरिवलीदेखील शर्यतीतशंभरावे नाट्यसंमेलन बोरिवलीमध्ये व्हावे, अशी मागणी परिषदेच्या बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. अध्यक्ष प्रशांत दामले यांना तसे पत्र दिले. बोरिवली शाखा गेली ३० वर्षे सांस्कृतिक उपक्रमांत अग्रेसर असल्याने संधी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Sangliसांगली