शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांचे मौन; रुग्णालयावर बोलणार कोण?, तासगावातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पडले धूळखात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:17 IST

हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण?

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव नगरपालिकेने सव्वा सहा कोटी खर्चून बांधलेल्या कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी मौन धारण केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या भावी आणि माजी नगरसेवकांनीही या हॉस्पिटलबाबतगांधारीची भूमिका घेतली आहे. राजकीय उदासीनतेमुळे वर्षभरापासून हे हॉस्पिटल धूळखात पडून आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी बोलणार तरी कोण, असा प्रश्न तासगावकरांना पडला आहे.नगरपालिकेने शासनाकडून सहा कोटी ३० लाखांचा निधी मिळवून  शहरात प्रशस्त अशा कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली. ऑक्सिजन प्लांट्ससह शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभा राहिले. वर्षभरापूर्वी या हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, लोकार्पणानंतरही हे हॉस्पिटल धूळखात पडून आहे.पुढाकार घेणार कोण?ठेकेदारी आणि टक्केवारीत रस घेणारे तासगावचे कारभारीही सध्या गांधारीच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी शहरातून पुढाकार घेणार तरी कोण, असा प्रश्न तूर्तास तासगावकरांना पडला आहे.हॉस्पिटल सुरू कसे करायचे?प्रशिक्षित कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर आणायचे कुठून, असा प्रश्न नगरपालिका प्रशासनापुढे आहे. हॉस्पिटलच्या जागेवर यापूर्वी आरोग्य प्रशिक्षण पथक आणि डॉक्टर कार्यरत होते. त्यांचे स्थलांतर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात करण्यात आले. तिथूनच या पथकाचा कारभार सुरू आहे. वर्षभरात ना या पथकाला ही इमारत मिळाली, ना इमारतीला तज्ज्ञ डॉक्टर मिळाले.उदासीनतेमुळे ठप्पप्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ कर्मचारी वर्ग आणि औषध पुरवठा होऊन जर जनतेला लाभ घ्यायचा असेल, तर या सर्व गोष्टींची पूर्तता शासनस्तरावर करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून सहकार्य मिळाले तरच हे हॉस्पिटल तासगावकरांच्या उपयोगी पडेल. मात्र, राजकीय उदासीनतेमुळे वर्षभरात याबाबत कोणतीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही.श्रेयवाद अधिकमतदारसंघात राजकीय कुरघोड्या, श्रेयवाद यासाठी आटापिटा करणाऱ्या नेत्यांनी हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. 

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल