शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एम.एस्सी. पदवीधर तरुण करणार शहरांची साफसफाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:50 IST

नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती आहे, तरीही तीन हजार अर्ज येऊन पडलेत.

ठळक मुद्देएम.एस्सी. पदवीधर तरुण करणार शहरांची साफसफाई!सहा महिन्यांसाठी नियुक्ती, तरीही तीन हजार अर्ज

संतोष भिसे सांगली : नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती आहे, तरीही तीन हजार अर्ज येऊन पडलेत.नोकरीऐवजी व्यवसाय-धंद्याचा सदुपदेश कितीही कानीकपाळी केला तरी, तरुणाईच्या पचनी पडण्याची चिन्हे नाहीत. अवघ्या सात हजारांत राबून नोकरीच्या रुबाबासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. नोकरीसाठी काहीही करायला तयार असल्याचे या नोकर भरतीवरुन दिसले आहे.सफाई कामगारांच्या १६५ जागा भरायच्या आहेत. शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण व वयोमर्यादा १८ ते ४० आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यानची मुदत होती. या अवघ्या आठवडाभरात तब्बल २ हजार ९०० तरुणांनी अर्ज केले. त्यापैकी सहाशेहून अधिक बारावीपेक्षा जास्त शिकलेले आहेत. त्यातील दोनशेजण बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. पदवीधर आहेत. सुमारे वीसभर तरुणांनी एम. कॉम., एम. एस्सी.च्या पदव्या मिळवल्यात.एकूणच या भरती प्रक्रियेने बेरोजगारीची व्याप्ती आणि तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. दरम्यान, महापालिकेतील बदली कामगारांनी नव्या भरती प्रक्रियेविरोधात कामगार न्यायालयात धाव घेतल्याने ती रखडली आहे.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली