शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचविताना मावशीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:13 IST

बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची

ठळक मुद्देबिळाशीतील घटना : वारणा डाव्या कालव्यात बुडाली

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची बहीण रंजना यशवंत पाटील (रा. मोहरे) मात्र बचावल्या.

इंदिरा बिळाशी येथील यशवंत दळवी यांच्या कन्या होत. त्या व रंजना सुटीसाठी काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. शुक्रवारी कपडे धुण्यासाठी त्या वारणा डावा कालव्यावरील शिराळकर डोहाजवळ गेल्या होत्या.

यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा यांचा मुलगा ओम, रंजना यांचा मुलगा सोहम व शेजारील यश साठे अशी तीन मुले होती. दोघी बहिणी कपडे धुण्यात व्यस्त होत्या. त्यावेळी यश याने पोहता येत असल्याने कालव्यात उडी मारली. हे पाहून त्याच्यापाठोपाठ सोहम व ओम यांनीही उड्या मारल्या. मात्र सोहमला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून इंदिरा पाण्यात उतरल्या व त्यांनी सोहम आणि ओम या दोघांनाही बाहेर काढले. मात्र, पाणी वाहते असल्याने आणि वेगाचा अंदाज न आल्याने इंदिरा बुडू लागल्या. ही बाब रंजना यांच्या निदर्शनास येताच त्यांनी इंदिरा यांना पाण्याबाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. विशेष म्हणजे रंजना यांना पोहता येत नसतानाही त्यांनी धाडस केले. एका हाताने त्यांनी कालव्याच्या काठावरील झाडाला घट्ट धरले, तर दोन्ही पायांमध्ये इंदिरा यांना धरून ठेवले होते.

दरम्यान, या घटनेने भयभीत झालेली तिन्ही मुले आरडाओरडा करत पळत सुटली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. रंजना यांचा भाऊ गुणवंत दळवी, कुमार शिराळकर, मयूर शिराळकर, बाबासाहेब परीट, बाबूराव पाटील, अक्षय लोहार, महेश लोहार, आकाश लोहार, दिनकर साळुंखे, अण्णा परीट, महादेव साठे आदींनी कालव्यात उडी घेतली व टायरट्यूब तसेच साडीच्या साहाय्याने दोघींना बाहेर काढले. मात्र, पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने इंदिरा बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना तात्काळ शिराळा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तथापि त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.इंदिराचे धाडस आणि मनाला चटकाबहिणीचा मुलगा बुडत असल्याचे पाहून, पोहता येत नसतानाही इंदिरा यांंनी पाण्यात उडी घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले व त्याचा जीव वाचविला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांनी धाडसाने बहिणीच्या मुलाचे प्राण वाचवले व स्वत: मृत्यूला कवटाळले. ही घटना मनाला चटका लावून जाणारी होती.

आज परतणार होत्या...इंदिरा सध्या मुंबईला कुटुंबासह राहत होत्या. महिन्यापूर्वी त्या सुटीसाठी माहेरी आल्या होत्या. सुटी संपल्याने त्या शनिवारी मुंबईला जाणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

 

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू